शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांची केली ढाल! कऱ्हाडचा साद शेख म्हणाला तर आम्ही..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 12:38 PM

रशियाचे इरादे लक्षात घेऊन खरेतर युक्रेनने तेथील विद्यापीठांना धोक्याची सूचना दिली असणार तरीही ही विद्यापीठे सुरुच ठेवली होती

सागर गुजरसातारा : रशिया हा भारताचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा विचार करुन रशिया हल्ला चढवणार नाही, हे लक्षात घेऊन युक्रेनमधील बहुतांश विद्यापीठांनी भारतीय शिकत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑफलाईन पध्दतीनेच सुरु ठेवले. थोडक्यात युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांची ढाल करुन बचावाचा प्रयत्न केला असल्याचे इव्हॅनो फ्रँक्वीस्क विद्यापीठात शिकणारा कऱ्हाडचा साद शेख याने सांगितले.रशियाने महिनाभरापासून युक्रेनच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव केली होती. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी आक्षेप घेतल्यानंतर युध्द सरावासाठी सैन्य सीमेवर आणले गेल्याचे स्पष्टीकरण रशियाने केले होते. मात्र, तरीही २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह येथे हल्ला चढवलाच.रशियाचे इरादे लक्षात घेऊन खरेतर युक्रेनने तेथील विद्यापीठांना धोक्याची सूचना दिली असणार तरीही ही विद्यापीठे सुरुच ठेवली होती. भारतातील २ हजारांच्यावर एमबीबीएस करणारे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत. त्यांचे शिक्षण सुरु ठेवले तर तीच ढाल म्हणून वापरता येईल, हा युक्रेनचा इरादा लपून राहिला नाही.भारतीय दुतावासाने परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्याच्या सूचना केल्या. मात्र, विद्यापीठांनी सुट्या दिल्या नसल्याने हे विद्यार्थी तिथेच अडकून पडले. युध्दाची धग लक्षात येताच नागरिकांनी बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या. एटीएम रिकामे झाले. बसने रोमानियाच्या सीमेपासू्न अलीकडे १० किलो सोडले. तिथून चालत जावे लागले. ४ हजारांच्यावर लोक सीमेवर धडकल्याने त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी रोमानियाच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाला होता.या ठिकाणी आठ तास थांबू राहावे लागले. पासपोर्ट तपासूनच सर्वांना रोमानियात प्रवेश दिला गेला. तिथून केंद्र शासनाने विद्यार्थ्यांना दिल्लीत विमानाने आणले. दिल्लीत महाराष्ट्र सदनात राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती. तिथून महाराष्ट्र शासनाने विमानाने या विद्यार्थ्यांना मुंबईत आणले.इव्हॅनो फ्रँक्वीस विमानतळावर पडला बॉम्बरशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील राजधानीच्या किव्ह शहरावर एअर स्ट्राईक सुरु केले होते. पश्चिमेकडील इव्हॅनो फ्रँक्वीस शहर तसे सुरक्षित होते. मात्र, अचानकपणे युध्दाच्या तिसऱ्या दिवशी रात्रीच्यावेळी इव्हॅनो फ्रँक्वीस विमानतळावर बॉम्ब येऊन पडला. या बॉम्बमुळे सर्वत्र धूर झाला. शहरातील नागरिक, विद्यार्थी झोपेतून जागे झाले. विद्यापीठापासून अवघ्या ४ किलो मीटरवर हा बॉम्ब हल्ला झाला होता.

रोमानिया सीमेवर सैनिकांकडून छळभारतीय दुतावासाने येथील विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड, नायझेरिया, हंगेरी या देशांमधून भारतात येण्याची सोय केली. मात्र, रोमानिया सीमा ओलांडून जात असताना येथील सैन्याने हवेत गोळीबार केला. तसेच गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना मारहाणदेखील केली. या छळाला मुलींना देखील सामोरे जावे लागले.

युक्रेनवर हल्ला झाल्याचे समजल्यानंतर घरातून फोन यायला लागले होते. रशियाने केलेला हल्ला युक्रेनच्या पूर्वेकडे केला होता. आम्ही होतो पश्चिमेकडे त्यामुळे घरातल्यांची समजूत काढत होतो, त्याचबरोबर रोमानियातून भारतात परतण्यासाठीही प्रयत्न करत होतो. रोमानियाच्या सीमेवर तणाव होता, या ठिकाणी गोळीबार झाला. मात्र, आम्ही सुरक्षितपणे भारतात परतलो.  - साद शेख, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया