शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

उंब्रजच्या रणरागिणीने घडवली चोरट्यांना अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : बहाणा करून बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरून पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला. ऊसाच्या फडात लपून बसलेल्या एका चोरट्याला पकडून अखेर पोलिसांच्या ताब्यातही दिलं. या रणरागिणीचे नाव आहे नाजिया नायकवडी-शेख. त्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवक आहेत. नाजिया ...

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : बहाणा करून बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरून पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला. ऊसाच्या फडात लपून बसलेल्या एका चोरट्याला पकडून अखेर पोलिसांच्या ताब्यातही दिलं. या रणरागिणीचे नाव आहे नाजिया नायकवडी-शेख. त्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवक आहेत. नाजिया यांचे माहेर मिरज असून उंब्रज सासर आहे. दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन चार युवकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भीक मागण्याचे नाटक करून चार ते पाच मुलांनी उंब्रज येथील सुरभी चौकात राहणाºया चाँद शेख यांच्या बंगल्याचे दार वाजवले. नाझीया सूरज शेख (नायकवडी) यांनी दरवाजा उघडला. ‘काही नाही,’ असे सांगून पुन्हा दरवाजा बंद करत त्या आतील खोलीत निघून गेल्या. त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी दरवाजाच्या ग्रीलमधून हात घालून हळूच दरवाजा उघडला अन् आत असलेला आयफोन घेऊन पलायन केले.दरम्यान, दरवाजा वाजल्याने नाझीया पटकन बाहेर आल्या. तेव्हा फोन चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या बंगल्यातून बाहेर आल्या. तोपर्यंत संबंधित चोरटे समर्थनगरकडे पळत गेले होते. त्यांनी पटकन आपली मोपेड बाहेर काढून त्यांचा पाठलाग केला. चोरटे जाधव मळ्याच्या बाजूकडील ऊसाच्या शेतात शिरले. नाझीया यांनी रस्त्यावर गाडी लावली. अन स्वत:ही ऊसाच्या शेतात शिरल्या. चोरट्यांपैकी एक जण ऊसाच्या सरीत झोपला होता. त्याला त्यांनी तेथेच पकडले अन् चोरट्यांनी बाजूला फेकून दिलेला मोबाईलही हस्तगत केला.इतर चोरटे फरारया घटनेनंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. यामुळे इतर चोरटे ऊसातून दुसºया दिशेने पळून गेले. त्यानंतर नाझीया यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फोन करून संबंधित चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन केले.विशेष म्हणजे, नाझीया यांना सहा महिन्यांचे बाळ आहे. चोरी झाल्यानंतर बाळाला घरात ठेवूनच धाडसाने पाठलाग करत चोरट्याला मुद्देमालासह पकडण्याचे जे धाडस त्यांनी दाखविले, त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.