शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन

By संजय पाटील | Published: April 18, 2023 1:48 PM

लाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते

संजय पाटीलकऱ्हाड : महाराष्ट्राची वरदायीनी असलेल्या कोयना नदीचा काठ सध्या पोखरला जातोय. पाटणपासून कऱ्हाडपर्यंत ठिकठीकाणी नदीकाठावर जेसीबी नाचवले जातायत. काहीजण परवाने घेऊन तर काही विनापरवानाच मातीचे बेसुमार उत्खनन करतायत. मातीसम्राटांनी मोठमोठे खड्डे खोदले असून काही ठिकाणी नदीकाठचे कडेही जमिनदोस्त करण्यात आलेत. त्यामुळे ठिकठिकाणी नदीपात्र बदलले आहे, विस्तीर्ण झाले आहे.महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली कोयना नदी दक्षिणेला वाहत जाऊन हेळवाक गावाजवळ पूर्व वाहिनी होते. कृष्णा नदीची ही सर्वात मोठी उपनदी आहे. तसेच कोयनेच्याही काही उपनद्या आहेत. याच कोयनेवर शिवसागर जलाशय असून कोयना धरणाची निर्मितीही करण्यात आली आहे. धरणापासून पुढे वाहत जाणाºया नदीपात्रात अनेक सिंचन योजना आहेत. तसेच निसरे व तांबवे येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. कोयनेच्या पाण्यावर लाखो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले असून धरणाच्या माध्यमातून राज्य प्रकाशमान झाले आहे.कोयनेतील पाण्याच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न झालेले असतानाच अनेकांनी लाल मातीत स्वत:चे उखळही पांढरे करुन घेतले आहे. नदीकाठावर असणाºया लाल मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्यामुळे ठिकठीकाणी नदीपात्र बदलले आहे. विस्तिर्ण झाले आहे. त्याबरोबरच नदीकाठची शेतीही केवळ कागदावर उरली असून अनेक मळ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या आहेत.

उगम ते प्रीतीसंगम१२५ : किलोमिटर अंतर

कोयनेच्या उपनद्यासोळशी - तापोळाकाजळी - संगमनगरकाफना - हेळवाककेरा - पाटणमोरणा - बेलवडेवांग - येरवळे

माती उत्खननाचे दुष्परीणाम

  • नदीकाठाची मोठ्या प्रमाणावर धूप
  • ठिकठीकाणी नदीकाठ खचला
  • खड्डे खोदल्यामुळे पाणी साचून राहिले
  • नदीकाठची शेती वाहून गेली
  • उत्खनन झालेल्या दिशेने नदीपात्र बदलले
  • नदीकाठावरील जुन्या झाडांची कत्तल
  • प्राणी, पक्ष्यांचे अधिवास नष्ट

२४ - नदीकाठची महत्वाची गावे

माती उत्खनन परवाने४३ : पाटण तालुका६१ : कऱ्हाड तालुका

जमिन गायब; उरला सातबाराकऱ्हाड तालुक्यात सुपने गावापासून वारुंजीपर्यंत काही ठिकाणी लाल मातीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे की, नदीपात्र बदलून नदीकाठची जमिनच गायब झाली आहे. शेतकऱ्यांकडे केवळ त्या जमिनीचा सातबाराच शिल्लक राहिला आहे. आपली जमिन शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

नदीकाठ उद्ध्वस्त; रस्त्यांची दुर्दशालाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते. त्यातच मातीच्या वाहतुकीमुळे गावागावातील पाणंद रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. माती वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे हे रस्ते शेतकऱ्यांसाठी वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी