आॅनलाईन लोकमतऔंध (जि. सातारा), दि. ५ : लोणी, ता. खटाव येथे गैरसमजातून कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एकाच्याविरोधात औंध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. याबाबत औंध पोलिस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, वालचंद रणपिसे हे दि.२ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एका लग्नकार्यावरून नातू आरूष यास घेऊन घरी परत येत होते. त्यावेळी ज्ञानेश्वर माने याने गैरसमज करून घेऊन कोयत्याने वालचंद रणपिसे यांच्या डोक्यावर व डाव्या हातावर वार केले. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्यांनाही गंभीर दुखापत केली. याप्रकरणी वालचंद रणपिसे यांनी ज्ञानेश्वर दत्तात्रय माने याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार औंध पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर बुधवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
गैरसमजातून कोयत्याने वार
By admin | Published: July 06, 2017 12:58 PM