संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : अवैध व्यावसायिकांवर ‘खाकी’चा वचक असणे गरजेचे असते. वचक नसेल तर तर दारू, मटका आणि जुगारवाले खाकीला जुमानत नाहीत. सावकारांचंही सध्या तसंच चाललंय. त्यांच्यावर अंकुश नसल्याने ते पोलिसांना घाबरत नाहीत. उघड-उघड त्यांचा आतबट्ट्याचा व्यवसाय चालतोय. एवढंच नव्हे तर एखाद्या प्रकरणात तडजोड करायला ‘खादी’ घालून पोलीस ठाण्यात जाण्यासही ते घाबरेनासे झालेत.पैशांसाठी अनेकजण सावकाराचा दरवाजा ठोठावतात़ दहा, वीस टक्क्यांनी त्यांच्याकडून कर्ज उचलतात; पण कालांतराने त्या गरजवंताची स्थिती जळू चिकटलेल्या जनावरासारखी होते़ ‘सावकार’ नावाचे जळू त्या गरजवंताचे पैसे शोषतातच; पण त्याहीपेक्षा त्याचं अन् त्याच्या कुटुंबीयांचं जगणं अक्षरश: मुश्कील करून टाकतात़गरीब असो अथवा श्रीमंत़. पैशांची गरज सर्वांनाच लागते़ गरिबाला श्रीमंत होण्यासाठी तर श्रीमंताला ‘गर्भश्रीमंत’ होण्यासाठी कायमच पैशांची हाव असते; पण गरजेपोटी सावकारासमोर हात पसरणाऱ्याला आयुष्यातून उठावे लागल्याची उदाहरणे आहेत़कर्जदारांचे हात दगडाखाली...गहाणखत करण्याऐवजी खरेदीखत करून सावकाराने एका शेतकºयाची जमीन घशात घातल्याचा प्रकार गत आठवड्यात कºहाडमध्ये उघडकीस आला होता. या प्रकारानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यांनी-ज्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे, अशा शेतकºयांचे या प्रकारामुळे धाबे दणाणले आहेत. मात्र, ‘हात दगडाखाली’ असल्याने संबंधित शेतकरी काहीच करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.परवानाधारक सावकार किती?कºहाडातील काहीजणांकडे सावकारीचा परवाना असल्याचे सांगितले जाते. मात्र, असे परवानाधारक सावकार किती, हेच कोणाला माहीत नाही. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे ते नियमाप्रमाणे सावकारी करतात का, हाही प्रश्न आहे.वसुलीसाठी गुंडप्रवृत्तींची नेमणूकएखाद्याला कर्ज दिल्यानंतर ते वसूल करण्यासाठी हरतºहेचे प्रयत्न केले जातात. संबंधिताचा मानसिक छळ करण्याबरोबरच त्याला दमदाटी, मारहाण करण्यापर्यंतही काही सावकारांची मजल जाते. त्यासाठी संबंधित सावकार काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांची नेमणूकही करतात.खासगी सावकारांनी दलालांची नेमणूक केली आहे़ ज्याला पैशाची गरज आहे, असे सावज शोधायचे अन् सावकाराच्या दारात नेऊन उभे करायचे, असा दलालांचा व्यवसाय आहे़
‘खाकी’च्या नाकाखाली बेधडक सावकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:00 PM