रामापूर : पाटण तालुक्यातील सुळेवाडी ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. सरपंचपदी सुनीता संजय नारकर व उपसरपंचपदी नितीन कृष्णात शेजवळ यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नांगरे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. परिवर्तन ग्रामविकास पॅनलने निवडणुकीत बाजी मारली. हनुमंतराव शेजवळ, सुरेश पाटील, शिवाजी नारकर, विलास पाटील, विजय शेजवळ, गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते यांनी याकामी परिश्रम घेतले. रतन शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. लहुराज पाटील यांनी आभार मानले.
विठामाता विद्यालयात आरोग्य शिबिर उत्साहात
कऱ्हाड : येथील पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरातील विठामाता विद्यालयात मुलींसाठी आरोग्य शिबिर व त्यावरील काळजीविषयक परिसंवाद झाला. मुलींना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, व्यवस्थापक तथा तांत्रिक तज्ज्ञ गीतांजली यादव, व्यवस्थापक तथा समुपदेशक दीपाली रेपाळ आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप झाले.
करवडीच्या सरपंचपदी सविता पाटील बिनविरोध
कऱ्हाड : करवडी (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता प्रवीण पाटील, तर उपसरपंचपदी हिंदुराव पिसाळ यांची निवड करण्यात आली. जानाईदेवी परिवर्तन पॅनलचा ज्येष्ठ नेत्यांनी सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला. यावेळी बी. एस. पाटील, भिकोबा पिसाळ, उत्तमराव पिसाळ, आनंदराव पिसाळ, दिनकर भोसले, जितेंद्र डुबल, बाळासाहेब भोसले, सुरेश कुंभार, शंकर पिसाळ, राजेंद्र पिसाळ, नेताजी पाटील, हनुमंतराव पिसाळ, हिंदुराव पिसाळ, नेताजी पाटील, प्रताप पिसाळ, विश्वास पाटील आदी उपस्थित होते.
कऱ्हाडला बचत गटांशी पालिकेचा संवाद
कऱ्हाड : पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरातील महिला बचत गटांशी संवाद साधण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून गटचर्चा झाली. त्यामध्ये महिलांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशाप्रकारे बनवता येतील. वस्तूंचा पुनर्वापर कसा करता येईल, याबाबत सविस्तर गटचर्चा करण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मलकापुरात लाभार्थ्यांना रिक्षाचे वितरण
कऱ्हाड : दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या सहकार्याने स्वयंरोजगार घटकांतर्गत मलकापूर येथील पालिका हद्दीतील कमी उत्पन्न घटकातील लाभार्थ्यांना रिक्षाचे वितरण करण्यात आले. मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, योजनेच्या सहायक प्रकल्प अधिकारी शाहीन मणेर यांची यावेळी उपस्थित होते. लाभार्थ्यांना सात टक्केपर्यंत व्याज अनुदानाचा लाभ मिळतो. व्यवसाय सुरू करणे, व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाहीन मणेर यांनी केले. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शाखाधिकारी मोसिन शिरगुप्पे उपस्थित होते.