सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ५० वर्षीय पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून दिलेली माहिती अशी की, सातारा बसस्थानक परिसरात शुक्रवार, १५ जानेवारी रोजी फलाट क्रमांक दहावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक व्यक्ती झोपलेल्या स्थितीत आढळून आली. त्याला सुरक्षारक्षक शंकर प्रल्हाद काटकर (वय ४०, रा. राजगुरुनगर, संगममाहूली फाटा, सातारा) यांनी उठविण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी सांगितले. पोलीस हवालदार दत्ता पवार हे अधिक तपास करत आहेत.
बसस्थानकात बेवारस मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:34 AM