सातारा : शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गीतांवर आधारित नृत्यचित्रांचे प्रदर्शन असा रिदम गाण्यांचा सन्मान कार्यक्रम नुकताच शाहू कला मंदिर येथे झाला.भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, नेहरु युवा केंद्र सातारा, शब्दप्रभू जगदीश खेबुडकर प्रतिष्ठान पुणे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, रिदम कला व साहित्य अकादमी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. याचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मेघराज राजेभोसले, आकाशवाणीचे असिस्टंट डायरेक्टर इंद्रजित बागल, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत माणखेडकर, जगदीश खेबुडकर यांची कन्या अंगाई खेबुडकर व रिदम कला व साहित्य अकादमीचे अध्यक्ष महेश सोनावणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी निर्माते अण्णा देशपांडे, प्रसिद्ध अभिनेता चंद्रकांत सूर्यकांत मांढरे यांची नात स्वरूपा मांढरे, विश्वस्त नितीन महाजन, निर्माते दिनेश व महेश देशपांडे, दिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे, मराठी चित्रपट महासंघाचे अध्यक्ष पी. वाय. कोळी, प्रदीप कांबळे उपस्थित होते.मराठी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध गाणी खेबुडकर यांची आहेत. तसेच महेश सोनावणे यांच्यामुळे नवीन कलाकार मराठी चित्रपटास मिळतील, असे मत व्यक्त केले. यावेळी चित्रकार अनिता पाटील व अपूर्वा रजपूत यांनी जगदीश खेबुडकर यांचे काढलेले हुबेहूब पेंटिंग बघून सर्वांना अचंबित केले. हे पेंटिंग अंगाई खेबुडकर यांना सप्रेम भेट देण्यात आले.
जगदीश खेबुडकरांना साताऱ्यात अनोखे अभिवादन
By admin | Published: May 12, 2017 10:26 PM