औंध : ‘वरुड गावाने एकजुटीने केलेली जलसंधारणाची कामे अतिशय कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
खटाव तालुक्यातील वरुड येथील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवेळी झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, डॉ. अविनाश पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, नरेंद्र मेडेवार, विस्तार अधिकारी नंदकिशोर माने, आबा लाड, जितेंद्र शिंदे, अधिक जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, शेतकऱ्यांनी आता गटशेतीकडे वळावे, आपली गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवावी, सार्वजनिक हिताच्या कामात गावची एकजूट टिकवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करा.’ श्रमदानातून केलेल्या कामांची प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सीसीटी, फळबाग लागवड, बंधारे, तलाव याचीही माहिती घेतली.
यावेळी वरुड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ औंध
फोटो: खटाव तालुक्यातील वरुड येथे जलसंधारणाची कामाची जिल्हाधिकारी शेखर सिंह, विनय गौडा, डॉ. अविनाश पोळ आदींसह मान्यवरांनी पाहणी केली. (छाया : रशीद शेख)