शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

मैत्री कर नाहीतर.., अज्ञाताने तरुणीला दिली धमकी; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 7:20 PM

अज्ञात माथेफिरुविरोधात पोलीस ठाण्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल

सातारा : येथील उपनगरात राहणाऱ्या एका मुलीला अज्ञात व्यक्तीने तिच्या राहत्या घरी चिठ्ठी पाठवून ‘माझ्याशी मैत्री कर नाहीतर तुझा चेहरा ॲसिडने जागेवर ठेवणार नाही,’ अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाची पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, शहरातील एका उपनगरात आत्याच्या घरी राहणारी २२ वर्षीय तरुणी खासगी नोकरी करते. एक अज्ञात माथेफिरु नकळत तिचा सतत पाठलाग करत होता. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिनापासून या माथेफिरुने तरुणीला त्रास द्यायला सुरुवात केली. तिची मैत्री मिळविण्यासाठी या माथेफिरुने तिला चिठ्ठ्या लिहिल्या. हा प्रकार कधी तरी थांबेल, असे समजून ही तरुण गप्प राहिली.मात्र हा प्रकार वाढतच गेला. धमकी देणाऱ्या चार चिठ्ठया तिच्या घरी आल्या. १४ फेब्रुवारी रोजी साडेबाराच्या सुमारास तिचा आत्तेभाऊ आणि या तरुणीच्या नावे माथेफिरुने चिठ्ठी पाठवली. या चिठ्ठीतही लज्जा उत्पन्न होईल, असा मजकूर लिहिलेला होता. तसेच ‘तुझ्याशी मैत्री करायची आहे, नाहीतर मी तुझा चेहरा ॲसिडने जागेवर ठेवणार नाही,’ अशी धमकीच या माथेफिरुने दिली.दरम्यान, या प्रकरणी अज्ञात माथेफिरुविरोधात पोलीस ठाण्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीच्या जीवाला धोका असल्याने या माथेफिरुला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पीडीत कुटुंबाने केलेली आहे.चार चिठ्ठ्या पाठवल्या...या तरुणीला धमकी देणाऱ्या चार चिठ्ठ्या पाठवल्या गेल्या. तरी देखील ही मुलगी सहन करत राहिली. सलग चार महिन्यांपासून हा प्रकार होत होता. तरी देखील पोलिसांत तक्रार दाखल केली गेली नव्हती. आता तर ॲसिडने चेहरा जाळण्याची धमकीच दिली गेल्याने ही तरुणी व तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून धमकी देणाऱ्या अज्ञात माथेफिरुविरोधात तक्रार दाखल केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी