सातारा : वहागावच्या उपसरपंचपदी अरुण शंकर रांजणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
अर्ज भरण्याच्या मुदतीत उपसरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने रांजणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण बर्गे यांनी काम पाहिले. ग्रामसेविका मोमीन यांनी त्यांना सहकार्य केले.
निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य विनोद कांबळे, संतोष शिराळे, वनिता रांजणे, अनिता रांजणे, मुक्ता रांजणे तसेच गावचे पोलीसपाटील श्रावण कांबळे उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, पंचायत समितीचे सदस्य दत्ता गावडे, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच अरुण रांजणे यांचे कौतुक केले आहे.
फोटो ओळ : महागाव तालुका जावली येथे नूतन उपसरपंच अरुण रांजणे यांचा सत्कार करण्यात आला.