दहिवडी : दहिवडी येथील नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या असून, या निवडी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी व मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी केल्या आहेत.
यामध्ये महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपती नगराध्यक्षा साधना गुंडगे, बांधकाम समितीच्या सभापतिपदी माजी नगराध्यक्ष दिलीप जाधव, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतिपदी ललिता जाधव यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत; तर उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे यांनी राजीनामा दिला असल्याने पाणीपुरवठा पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
सभापती निवडी झाल्यानंतर आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती भास्करराव गुंडगे, माजी सभापती अतुल जाधव, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, अर्जुन काळे, सिद्धार्थ गुंडगे यांनी कौतुक केले आहे.
चौकट:
दहिवडी नगरीच्या विकासासाठी आम्ही आजी-माजी नगराध्यक्ष एकत्र येऊन उर्वरित कालावधीमध्ये विकासासाठी कटिबद्ध आहोत. आताच्या या निवडी पदाधिकाऱ्यांच्या अनुभवानुसार सारासार विचार करून करण्यात आल्या आहेत.
- धनाजी जाधव, नगराध्यक्ष, दहिवडी