शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
4
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
6
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
7
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
8
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
9
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
10
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
11
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
12
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
13
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
14
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
15
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
17
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
18
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
19
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
20
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

हिवाळ्यात पावसाळा; साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी, नागरिकांची त्रेधातीरपीट

By नितीन काळेल | Published: January 10, 2024 6:24 PM

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हिवाळ्यात पावसाळा ऋतु अनुभवावा ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हिवाळ्यात पावसाळा ऋतु अनुभवावा लागला. तर सातारा शहरात जवळपास दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. तसेच सायंकाळी शाळा सुटूनही विद्यार्थ्यांना पावसामुळे वेळेत घरी जाताा आले नाही.जिल्ह्यातील नागरिकांना मागील चार दिवसांपासून वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे. कधी थंडी पडत आहे. तर काहीवेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यातच दोन दिवसांपासून अवकाळी पावसाशी सामना करावा लागत आहे. सातारा शहरात तर मंगळवारपासून अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे दोन दिवसांपासून नागरिकांना सूर्यदर्शनही झाले नाही. बुधवारी तर दुपारी तीननंतर गडद ढगाळ वातावरण तयार झाले होते. चारच्या सुमारास शहरासह परिसरात पावसाला सुरूवात झाली. प्रथम काही भागात जोरदार सरी पडल्या. मात्र, त्यानंतर रिपरिप सुरू झाली. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत अवकाळीचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. जवळपास एक तासभरतरी त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. तर बहुतांशी शाळा सायंकाळच्यावेळी बंद होतात. त्यामुळे शाळा सुटूनही विद्यार्थ्यांना पावसाची रिपरिप असताना थांबून राहवे लागले. पाऊस थांबल्यानंतर विद्यार्थी घरी गेले. तर सातारा शहरात पाऊस असल्याने सर्वच रस्त्यावर छत्री घेऊन चाललेले नागरिक दिसून आले. बुधवारी सायंकाळी झालेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता.सातारा शहराबरोबरच जिल्ह्यातील काही ठिकाणीही अवकाळीने हजेरी लावली. या पावसात जोर नसलातरी वातावरणात बदल झाला आहे. तसेच ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे पिके आणि फळबागांनाही धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबागांवरतरी रासायनिक औषधांची फवारणी करावी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस