शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अप्रशिक्षित हात ठरतायत धोकादायक

By admin | Published: January 13, 2016 12:20 AM

तरुणांमध्ये मोठी क्रेझ : आयुष्यभर राहतायत चुकीच्या टॅटूच्या खुणा

प्रगती जाधव-पाटील-  सातारा‘फॅशन स्टेटमेंट म्हणून तरुणाईला आता गोंदण अर्थात टॅटू काढणं खूपच हक्काचं वाटू लागले आहे. सौंदर्यात भर टाकणं आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणं अशासाठी टॅटू काढण्याची क्रेझ अधिक आहे. पण टॅटू काढणारे अप्रशिक्षित हात अलीकडे धोकादायक ठरू लागले आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये साताऱ्यात टॅटू काढण्याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पूर्वी टॅटू काढायचे म्हटले की महानगरांची वारी ठरलेली असायची. महानगरांमध्ये असलेल्या प्रशिक्षित कलाकारांची वेळ घेऊन टॅटूचे परिणाम-दुष्परिणाम यांची माहिती देऊनच मग टॅटू काढले जात होते. त्यामुळे हे टॅटू खूपच महाग होते. पण त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही आणि निवडलेली डिझाईन जशीच्या तशी दिसणार याची खात्री होती.सातारा जिल्ह्यात टॅटू काढणाऱ्या कलाकारांची संख्या चांगलीच वाढलेली दिसते. शहरातही गल्ली-बोळांमध्ये टॅटू काढून मिळू लागले आहेत. महागडे टॅटू अगदी कमी किमतीत काढून मिळायला लागल्यामुळे युवकांच्या झुंडी या टॅटू दुकानाच्या बाहेर दिसू लागल्या. मात्र, टॅटू काढल्यानंतर काही दिवसांत त्वचा खराब होणे, त्यात पस होणं, टॅटू काढलेली जागा अतिरिक्त सुजणं असे काही प्रकार घडू लागले आहेत. कित्येकदा टॅटू काढण्यासाठी आवश्यक असणारी सुई आणि त्यावर लावण्याचे क्रीमही निकृष्ट दर्जाचे वापरलेले असते. त्यामुळेही त्वचेला नुकसान पोहोचत आहे. अचूकता हे टॅटू काढण्याचे गमक आहे. त्यामुळे प्रशिक्षित हातच अपेक्षित टॅटूचे डिझाईन त्याच्या बारकाव्यांसह काढून देऊ शकतात. कित्यकदा ‘सांगितला गणपती आणि काढला मारुती’ अशी अवस्था तरुणांची होते आणि मग कलाकाराची चूक आयुष्यभर आपल्या अंगा-खांद्यावर वागविण्याशिवाय तरूणांना पर्याय राहत नाही. प्रशिक्षितांची सुबकताप्रशिक्षण घेऊन सराव केलेल्या कलाकारांना त्वचेचे थर आणि त्यावर काढण्यात येणारी कला कशी दिसेल याचा अंदाज असतो. कोणत्याही चेहऱ्याचा जिवंतपणा दाखविण्यासाठी त्याचे डोळे बोलके असावे लागतात. डोळ्यात हा जिवंतपणा आणण्यासाठी सरावाची गरज असते. प्रशिक्षित हातांतून साकारलेली कलाकृती सुबक, डोळ्यांना अल्हाददायक आणि आकर्षक दिसते. त्यातील प्रत्येक रेष स्पषट दिसते.दोनशेहून अधिक नवखे कलाकार व्यवसायातसातारा जिल्ह्यात टॅटू काढणाऱ्या नवख्या कलाकारांचे प्रस्थ चांगलेच वाढू आहे. यांची कोठेही नोंदणीकृत संस्था नाही. पण ओळखीवर हा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. दोनशे रूपयांपासून हे नवकलाकार टॅटू काढून देतात. तर व्यावसायिक कलाकार यासाठी किमान हजार रुपये घेतात. त्वचेच्या तिसऱ्या स्तरापर्यंत टॅटू काढणं सुरक्षित मानले जाते.तरुणांबरोबरच प्रोफेशनल्सह टॅटूच्या प्रेमातसाताऱ्यात महाविद्यालयीन तरुण-तरुणींबरोबरच काही व्यावसायिक या टॅटूच्या प्रेमात पडले आहेत. पाठीवर, मानेवर, दंडावर, हातावर टॅटू काढण्याची क्रेझ सातारकरांमध्ये दिसते.प्रशिक्षित हातांनी काढलेला टॅटू तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवते तर अप्रशिक्षित हात सौंदर्यावर डाग बनून राहतो. कोणत्याही कलाकाराकडून टॅटू काढून घेताना त्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र तपासले तरीही तरुणाईची फसगत होणार नाही. -कृष्णा पातुगडे, टॅटू कलाकार, वाईटॅटू काढताय?टॅटू काढण्यापूर्वी त्याचे शरीरावर काय परिणाम होणार याची माहिती घ्याटॅटू काढल्यानंतर त्याची घ्यावयाची काळजी नीट समजून घ्यामित्राने काढले म्हणून त्याच्यासारखेच काढा हे म्हणणे सोडाआपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणून टॅटू आर्टकडे बघाटॅटूचे डिझाईन पसंत करताना त्याचे अधिकाधिक पर्याय निवडाटॅटू काढण्याचा निर्णय घाई-गडबडीत घेऊ नकासातारकरांना नावांची क्रेझ अधिकसाताऱ्यातील बहुतांश तरुणाईच्या अंगा-खांद्यावर टॅटू आर्ट दिमाखात विराजमान झाली आहे. तरुणाईसह अनेक पुरुषांनी पत्नी, मुलगी, आई यांच्या नावाचे टॅटू काढले आहे. तरुणींचा ओढा फुले आणि पानांच्या डिझाईनकडे असतो. काहीजण देवांच्या छबी, राजमुद्रा, शिवाजीराजे यांचा टॅटू काढून घेतात, तर काही व्यावसायिक लोक ‘अ‍ॅब्सट्रॅक्ट आर्ट’ काढण्याला पसंती देतात.