शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उरमोडीचे पाणी आमदारांमुळेच !

By admin | Published: September 04, 2016 11:50 PM

दत्तात्रय हांगे : विनाकरण टीका करण्याची भाजपची धडपड; त्यांना आता जनताच जागा दाखवेल

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी खटाव-माण तालुक्यांत आणण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी गेली साडेसहा वर्षे केलेले प्रयत्न जनतेने पाहिले आहेत. आताही पावसाळी अधिवेशनात त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच उरमोडीचे पाणी माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात साठले आहे. माणमधील जनतेला पाणी आल्याने मोठा आनंद झाला. मात्र, डॉ. दिलीप येळगावकर आणि भाजपा आमदार गोरेंवर टीका करण्याची केविलवाणी धडपड करत आहेत. जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा लवकरच कळेल,’ असा टोला काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. दत्तात्रय हांगे यांनी लगावला. दहिवडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. हांगे म्हणाले, ‘आ. जयकुमार गोरे यांनी आघाडीच्या कार्यकाळात रात्रंदिवस परिश्रम करून उरमोडीसह इतर पाणी योजनांच्या कामांना गती दिली. पहिल्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघात पाणी आणण्याचा शब्द जनतेला दिला होता. प्रयत्नपूर्वक त्यांनी तो शब्द खरा करून दाखविला. खटाव तालुक्यानंतर आमदारांनी उरमोडीचे पाणी दोन वर्षांपूर्वी माणमध्येही आणले. हजारोंच्या साक्षीने माणमध्ये त्या पाण्याचे स्वागत झाले होते. जनतेने त्यांना जलनायक ही उपाधी मोठ्या विश्वासाने बहाल केली आहे. त्यानंतर अनेक वेळा उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणून दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न आ. गोरेंनी केला आहे. पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे मागणी करून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पावसाचे वाहून जाणारे पाणी उचलून दुष्काळी माण-खटावला आ. जयकुमार गोरेंनीच आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उरमोडी ही एकच उपसा सिंचन योजना अशा प्रकारे सुरू आहे. खटाव तालुक्यातून उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आणि आता माणगंगा नदीतून बंधारे भरत पुढे चालले आहे. पाण्याचे महत्त्व आ. गोरेंना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच त्यांनी पाणी सोडण्याची मुदत वाढवून घेतली आहे. माणदेशी जनता त्यांना कायम धन्यवाद देत आली आहे. पळशीत पाणी पूजनासाठी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने जनता आली.’ (प्रतिनिधी) विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार... बंधाऱ्याच्या कामाबाबत बरळणाऱ्यांनी आ. गोरेंनी आजपर्यंत मतदार संघात ५०० सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी केल्याचे बहुदा माहीत नसावे. माण-खटावमधील बंधाऱ्यांच्या पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्याने स्वीकारावा, हे त्यांना दिसले नाही का? दुसऱ्या बाजूला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आ. गोरेंवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांना अद्याप हे आणि या अगोदर आलेले पाणी उरमोडीचेच आहे. यावर विश्वास बसला नाही. राज्यात सत्तेत असल्याने त्यांचेच कार्यकर्ते पाणी बंद करा. नाहीतर आगामी निवडणुकीत आपले काही खरे नाही, असे वरिष्ठांना सांगत आहेत. पाणी बंद करण्यासाठी धडपडणारी भाजप कुठे आणि आणखी वाढीव दिवसांसाठी पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करणारे आ. गोरे कुठे, हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळेच पळशी गावाने आ. गोरेंची दोन्ही विधानसभा निवडणुकीत पाठराखण केली. माणदेशी जनता यापुढेही त्यांच्या पाठीशी ठाम राहून विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार आहे, असा विश्वासही अ‍ॅड. हांगे यांनी व्यक्त केला. पुतणा-मावशीची कळवळा ४परिश्रमाने आणलेले पाणी पाहण्यासाठी आमदारांनी दुचाकीवरून रपेट मारली. दुष्काळ हटविणे हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. त्या कामात श्रेयवाद नकोच, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच न करणारे पुतणा-मावशीचा कळवळा आणत आहेत असा टोलाही या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. हांगे यांनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.