शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
4
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
5
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
6
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
7
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
8
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
10
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
11
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
12
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
13
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
14
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
15
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
16
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
17
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
18
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
19
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
20
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

उरमोडीचं पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत

By admin | Published: September 19, 2016 11:20 PM

जयकुमार गोरेंच्या हस्ते पूजन : वरकुटे मलवडी, मार्डी परिसरातील पाणी प्रश्नासाठी आता शासनाविरोधात लढण्याची भूमिका

म्हसवड : ‘उरमोडीचे पाणी मते आणि राजकारणासाठी आणलं नाही. आजचा दिवस हा माझ्यासाठी, माणगंगेसाठी आणि सिद्धनाथ नगरीसाठी ऐतिहासिक आहे. उरमोडीचे पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत आणलं, आता लढाई जिहे-कटापूर, वरकुटे मलवडी परिसरातील १३ गावे व मार्डी परिसरातील १४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी आहे. शासनाला जाग आणण्यासाठी यापुढील काळात आंदोलन करावे लागेल तरी मागे हटणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.म्हसवड, ता. माण येथे माणगंगा नदीत उरमोडी पाण्याच्या पूजन कार्यक्रमानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती अक्काताई मासाळ, उपसभापती अतुल जाधव, म्हसवडचे नगराध्यक्ष रवींद्र वीरकर, उपनगराध्यक्ष रूपाली कोले, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, सोनिया गोरे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, विजय धट, प्रतिभा लोखंडे, वैशाली लोखंडे, मार्केट कमिटीचे सभापती अरुण गोरे, भीमराव पाटील, दिगंबर आगवणे, किरण बर्गे, दादासाहेब काळे, बाळासाहेब माने, विशाल बागल, सोमनाथ भोसले, संजय जगताप, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, शंकर वीरकर, डॉ. वसंत मासाळ, मारुती वीरकर, अकिल काझी, बाळासाहेब पिसे, लुनेश वीरकर आदी उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘आजवर निवडणुका आल्या की तोच जाहीरनामा असायचा. त्यामध्ये माण-खटावच्या पाणीप्रश्न व सर्वांगीण विकास हे दोन कायम वाक्ये; पण मी पहिली निवडणूक लढवताना माणच्या मातीला पाणी देणार व सर्वांगीण विकास करणार ही आश्वासने दिली. ती पूर्णत्वास जात असल्याने मला याचा अभिमान आहे. यासाठी अनेक अडचणींवर मात करत अखेर उरमोडीचे पाणी माणच्या मातीत आणण्यात यशस्वी झालो. तरी या पुढील लढाई जिहे-कटापूर योजनेसाठीची आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी २५० कोटींचा निधी मिळवण्यासाठी, वरकुटे मलवडी परिसरातील १३ गावांचा व मार्डी परिसरातील १४ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. यासाठी मला तुमच्या साथीची व पाठबळाची गरज आहे. दुष्काळी जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी लढलो. उरमोडीचे आलेले पाणी जपून वापरा, पावसाचे पडणारे पाणी आडवण्याची साधने निर्माण केली. जलयुक्त शिवार योजनेची प्रथम माणमध्ये आम्ही सुरुवात केली. ही योजना नंतर राज्याने स्वीकारली. साखळी बंधाऱ्यांचा पायलट प्रोजेक्ट, कोल्हापूर टाईप बंधारे या सर्व संकल्पना माण-खटावच्या मातीत पहिल्यांदा माझ्या प्रयत्नातून व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठबळाने सुरू करण्यात यशस्वी झालो. नंतर यासर्व संकल्पना राज्याने स्वीकारल्या. याचा अभिमान आहे.’चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘मी जेव्हा पहिल्यांदा म्हसवडमध्ये आले तेव्हा येथील जनतेच्या पाणीप्रश्नासाठी आंदोलन करण्यासाठी आले. या आंदोलनानंतर अटकही झाली. परंतु पाणीप्रश्नासाठी या भागात आले व नंतर मी येथीलच झाले. दुष्काळी जनतेची दु:खे मी पाहिली असून, आपल्याला पाणीदार आमदार मिळाल्याने या भागात पाणी आले आहे. येथील ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिरामध्ये नवरात्र उत्सवात नगरप्रदक्षिणा, गावप्रदक्षिणेसाठी हजारो भक्तगण जात असतात. तसेच आजवर कोरड्या नदीत येथील सुवासिनी दीपोत्सव साजरा करत. परंतु आता ते दिवस संपले असून, यापुढील काळात नदीतील पाण्यातच दीपोत्सव साजरा होणार आहे. हे आ. गोरे भाऊंमुळे शक्य होणार आहे.’ (प्रतिनिधी) चांगल्या कामावर टिवटिव नको... बंधारा कोणी आणला, पाणी कोणी आणले यासाठी मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. हे सर्व कोणी आणले हे माझ्या स्वाभिमानी जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी आपली टीव टीव बंद करावी. चांगले करता येत नसेल तर किमान झालेल्या समाजोपयोगी कामांवर तक्रारी तर करू नये, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.