शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

फलटणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सुगंधी शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:05 PM

विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार ...

विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार यांनी पाच गुंठे क्षेत्रात मोगºयाचा सुगंध फुलवत आपल्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.लहानपणापासून शेतीची आवड असणारे सुरेंद्र हे हार बनविण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करत असतानाच मोगºयाच्या फुलांची शेती करण्याची कल्पना त्यांना सुचली. हार, गजरे तयार करताना मोगºयाच्या फुलांचा तुटवडा त्यांना जाणवू लागला. त्यातूनच त्यांनी त्यांच्याकडे असणाºया पाच गुंठे क्षेत्रात बारामती येथून आणलेली मोगºयाची रोपे लावली आणि गेल्या तीन वर्षांपासून अखंडपणे या प्रयोगातून त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण झाले.सुरेंद्र यांच्या शेतात आज शंभर झाडे आहेत, त्याचे त्यांनी व्यवस्थित हंगामवार नियोजन केले आहे. मार्च ते सप्टेंबर या महिन्यांत महाराष्ट्रीयन एक पाकळी मोगरा त्यांनी लावला आहे तर सप्टेंबर ते मार्च यासाठी बेंगलोरचा कांगडा त्यांनी लावला आहे. कमी क्षेत्र असणाºया शेतकºयांसाठी फुलशेती निश्चितच फायद्याची ठरत आहे.सुरेंद्र यांचे सर्वच कुटुंबीय सकाळी लवकर कळ्या तोडायला सुरुवात करतात. या कामात त्यांची पत्नी अश्विनी, आई सरस्वती, वडील दत्तात्रय व मुलगा धनराज त्यांना मदत करतात. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत सर्व फुलकळी तोडून नंतर फलटण येथील हार विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जातो.मोगºयाला ग्रामीण भागात किलोला दोनशे ते अडीचशे रुपये हमखास मिळतात. लग्न तिथीच्या दिवशी तीनशे ते चारशेपर्यंत हा दर जातो. शहरात मोगºयाला किलोमागे पाचशे ते सहाशे रुपये दर मिळतो. त्यामुळे कमी क्षेत्र आहे म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. उलट क्षेत्र कमी असल्यामुळे आपण तिच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.झाडांना समजूनघेणं आवश्यक..प्रत्येक शेतकºयाने प्रयोगशील असले पाहिजे. शेतीत माती आणि पाणी हे एक प्रकारचे गणित आहे. झाडांना काय पाहिजे आणि काय नको, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण माणसांना, जनावरांना समजून घेतो तसेच झाडांना शेतीला घेतलं तर आपणास कधीच नुकसान होणार नाही, असे ही सुरेंद्र पवार सांगतात.