कऱ्हाड : सातत्यपूर्ण उपक्रमातून राज्यातच नव्हे तर देशामध्ये आपला वेगळा ठसा उमटविलेल्या मान्याचीवाडी गावाने आज आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामसभा घेणारी मान्याचीवाडी आता राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.राज्यातील दुर्गम तालुका म्हणून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याची ओळख आहे आणि या पाटण तालुक्याच्या एका कोपºयात मान्याचीवाडी ही सव्वाचारशे लोकसंख्या असलेलं गाव वसलेलं आहे. २००१ मध्ये याला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेत या गावाने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावयाला सुरुवात केली तो आजपावतो फडकवतच ठेवला आहे.
मंगळवार, दि. २१ रोजी सकाळी साडेदहा वाजता मान्याचीवाडी ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थांनी गर्दी करायला सुरुवात केली. प्रवेशद्वारावर असणाºय बायोमेट्रिक मशीनवर ग्रामस्थांनी आपल्या अंगठ्याचे ठसे दिले आणि सभागृहात प्रवेश केला. बघता बघता सभागृह भरून गेले. सरपंच रवींद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. ग्रामसेवक प्रसाद यादव यांनी विषयांचे वाचन केलेव्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवादमान्याचीवाडी ग्रामसभेने बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करीत ग्रामसभा घेण्याचा राज्यातला पहिला मान पटकाविला. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मान्याचीवाडी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी डॉ. शिंदे यांनी हा उपक्रम राज्याला आदर्शवत ठरेल तसेच यामुळे ग्रामसभा पारदर्शक होतील व ग्रामसभेच्या माध्यमातून निर्माण होणारे वाद थांबतील, अशी आशा व्यक्त केली.ग्रामसभेत झालेले महत्त्वाचे ठरावआजपर्यंत सातबारावर फक्त पतीचेच नाव लिहिले गेले आहे. मात्र, या ठिकाणी पतीबरोबर पत्नीचेही नाव यावे, याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.मुलींचा जन्मदर घटत आहे, ही गंभीर बाब ओळखून यापुढे गावातील कोणीही गर्भलिंगनिदान चाचणी करावयाची नाही, असा ठरावही एकमताने घेण्यात आला.ग्रामीण भागातील महिला आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष व्हाव्यात, यासाठी अस्मिता योजना प्रभावीपणे राबविणे.
ग्रामसभा बळकट झाल्या तर निश्चितच गावाचा कायापालट होतो, हे आमच्या ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. यासाठी ग्रामसभांना उपस्थिती महत्त्वाची असून, ग्रामसभेचा सदस्यच या सभांना उपस्थित असला पाहिजे. यासाठी बायोमेट्रिक पद्धती गरजेची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये या पद्धतीचा वापर केल्यास पारदर्शक ग्रामसभा होतील आणि चुकीच्या पद्धतीने उधळणाºया जाणाºया ग्रामसभांना यामुळे नक्कीच सुसूत्रता येईल. या उपक्रमांसाठी अधिकारी तसेच मार्गदर्शक उत्तमराव माने यांचे सहकार्य लाभले आहे.- रवींद्र माने सरपंच, ग्रामपंचायत मान्याचीवाडी, ता. पाटण