सातारा : कोरोनाच्या जागतिक महामारीत निर्माण झालेली आर्थिक-भावनिक कोंडी, हातातून गेलेले काम आणि अंधकारमय असलेले भविष्य, यामुळे अनेकांना ताणाचा सामना करावा लागत आहे. हा ताण घालविण्यासाठी हातात आलेला मोबाईल दूर होत नसल्याने अनेकांना निद्रानाशाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.
कोरोनामुळे सामान्यांच्या आयुष्यात सर्वाधिक उलथापालथ झाली आहे. भविष्याच्या विषयी टोकाची अनिश्चितता हे त्याचं मुख्य कारण आहे. कडक लॉकडाऊन असल्यामुळे दिवसभर घरात कैद राहिल्याने भावनांचा होणारा कोंडमारा व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ न मिळाल्याने होणारी घुसमट अनेक घरांमध्ये अव्यक्त राहिली आहे, हेही निद्रानाशाचं महत्त्वपूर्ण कारण असल्याचे समोर येत आहे.
मोठ्या शहरांत नोकरीच्या निमित्ताने राहणारी अनेक कुटुंबे वर्क फ्रॉम होम असल्याने साताऱ्यात दाखल झाली आहेत. याबरोबरच ऑनलाईन शाळा आणि कॉलेज असल्याने साधारणपणे सर्व वयोगटात स्क्रीन टाइम वाढल्याचे दिसत आहे. यामुळेही निद्रानाशाचे रुग्ण वाढलेले पाहायला मिळत आहेत.
चौकट :
पॉइंटर (आवश्यक असल्यास)
झोपण्याच्या वेळेच्या किमान तासभर आधी इलेक्ट्रॉनिक गॅझेट दूर ठेवा
झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा
वामकुक्षीची सवय असेल तर ती अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी
झोपण्याच्या चार तास आधी मद्यपान, धूम्रपान, चहा, कॉफी सेवन टाळावे
झोपण्यापूर्वी दोन तास आधी व्यायाम टाळावा
विचलित करणारे आवाज व प्रकाश शक्य तितके कमी करण्याचा प्रयत्न करावा
आपले जैविक घड्याळ पर्यावरणातील सूर्यप्रकाशावर अवलंबून असते, त्याचा समतोल सांभाळा
झोप कोणाला किती?
नवजात बाळ : १८ ते २० तास
एक ते पाच वर्षे : १२ ते १४ तास
शाळेत जाणारी मुलं : १० तास
२१ ते ४० : ८ ते ९ तास
४१ ते ६० : ७ ते ८ तास
६१ पेक्षा जास्त : ६ ते ८ तास
वैद्यकीय सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
निद्रानाशाचा त्रास असलेल्या रुग्णांना व्यायाम, तसेच काही थेरपी सुचवल्या जातात. अगदीच आवश्यकता भासल्यास औषधे दिली जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या घेणे घातक ठरू शकते. एखादी गोळी सातत्याने घेतल्यास त्याची मेंदूला सवय होते. हळूहळू एका डोसचा परिणाम होईनासा होतो. मग लोक आपणहून डोस वाढवतात. दिवसा झोप येणे, शरीर थरथरणे, हृदयाची गती वाढणे असे दुष्परिणाम जाणवू लागतात, असे तज्ज्ञ सांगतात.
तणावाने उडतेय झोप?
कोविडकाळात अनेकांना आर्थिक आणि कौटुंबिक स्थित्यंतरातून जावं लागत आहे. अनपेक्षितपणे कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना गमावणं, आजारामुळे आर्थिक ताण येणे याबरोबरच भविष्य अंधकारमय दिसू लागल्याने अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. तीन-चार तास झोपल्यानंतर जाग येणं, पहाटे थोडा वेळ झोप लागणं असे त्रास काहींना जाणवतात. मेलॅटोनिन हार्मोनचे प्रमाण असंतुलित झाल्यामुळेही झोपेवर परिणाम होतो. झोप पूर्ण न झाल्यास एकाग्रता कमी होणे, अस्वस्थता वाढणे असे दुष्परिणाम जाणवतात.
चांगली झोप यावी म्हणून हे करावे...
शांत जागी झोपावे
मांसाहार टाळा
मद्यपान, धूम्रपान टाळा
चालण्याचा व्यायाम करा
कॉफी सेवन नको
चांगल्या जागी झोपा
खोलीत नियंत्रित तापमान ठेवा
नियमित वेळेत उठा
गॅझेट दूरच ठेवा
मोबाईल गेम टाळा
तणावमुक्त राहा
थंड पाण्याने पाय धुवा
कोट :
मोबाईलच्या अतिवापराने झोपेवर निश्चित परिणाम होतो. ही उपकरणे जवळ घेऊन झोपणेही तितकेच धोकादायक आहे. निद्रानाश, डोळ्यांचे विकार, मानसिक अस्वस्थता तसेच पुरेशा झोपेअभावी रोगप्रतिकारशक्ती कमी होणे अशा गोष्टींचा सामना यामुळे करावा लागतो. त्यामुळे गरजेपुरता मोबाईल वापरावा आणि पुरेशी झोप घेण्यासाठी तणावमुक्त राहावं.
- डॉ. ...