शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
3
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
4
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
5
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
6
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
7
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
8
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
9
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
10
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
11
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता
12
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
13
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
14
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
15
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
16
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
17
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात हा दिला उमेदवार
18
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
19
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

उत्तरमांड धरण, डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 4:08 PM

धरणाच्या सांडव्यावरुन २५९० घ.फु.प्र.से. पाणी वाहू लागले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला

हणमंत यादवचाफळ: कराड - पाटण  तालुक्याला  वरदान ठरलेले चाफळ विभागातील गमेवाडी येथील उत्तरमांड धरण व वाघजाईवाडी येथील डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरुन सांडव्याव्दारे पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.गत पंधरा दिवसापासुन धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. काल, सोमवारी सायंकाळी धरणाच्या सांडव्यावरुन २५९० घ.फु.प्र.से. पाणी वाहू लागले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.गमेवाडी येथे उत्तरमांड धरण असून नाणेगांव ब्रुद्रुक गावच्या सरहद्दिवर उत्तरमांड नदिवर हा प्रकल्प साकारला आहे. संपुर्ण चाफळ विभागासह कराड तालुक्यातील खालकरवाडी, चरेगांव, भवानवाडी, उंब्रज परिसरातील वाड्या वस्त्यांना या धरणाचे पाणी मिळते. सध्या उत्तरमांड मध्यम प्रकल्पात 693.70 टीएमसी पाणीसाठा आहे.प्रकल्पाचे काम पूर्ण पण विस्थापितांचे प्रश्न प्रलंबितएक हजार ४२० मीटर लांब व ४४.४५ मीटर उंच असलेल्या जलाशयात ६८३ मीटर जलसंचय पातळी आहे. या प्रकल्पात तब्बल ६२५ एकर जमीन बाधित झाल्याने नाणेगांव , माथणेवाडी ग्रामस्थांना विस्थापित व्हावे लागले आहे. धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या पिचींगसह सांडव्यातील पंधरा मीटर उंचीच्या भिंतीचे काम पुर्ण केले आहे. पुराचे पाणी सोडण्यासाठी दगडी बांधकामाच्या सांडव्यावर १२×४ मीटर आकाराचे तीन वक्र दरवाजे बसवले आहेत. परंतु माथणेवाडीकरांचे पुनर्वसन रखडल्याने धरणात एक टीएमसी पाणीसाठा करण्यास  प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी आजही विस्थापितांचे प्रश्न प्रलंबित आहेत.डेरवण पाझर तलावही ओव्हर फ्लोवाघजाईवाडी जवळ असणारा डेरवण पाझर तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. याही तलावाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. गत वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तलाव ओव्हर फ्लो झाला होता. या तलावाचे पाणी वाघजाईवाडी, डेरवण, गमेवाडी, बोर्गेवाडी, शिंगणवाडी, चाफळ, माजगांव आदी गावातील शेतजमिनींना मिळते. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी