सातारा : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सोमवार, दि. १ मार्चपासून प्रारंभ होत असून, आता सर्वसामान्य नागरिकांची लसीची प्रतीक्षाही संपणार आहे. शासनाने लसीकरणासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. जिल्ह्यातील २२ खासगी रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
देशात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला होता. आता दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू होत आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील इतर आजार असलेले नागरिक खासगी रुग्णालयात जाऊन ही लस टोचून घेऊ शकतात. लसीकरणासाठी शासनाकडून २५० रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. शासनाने लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला असून, राज्यासह जिल्ह्यातील रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, वडूज, कोरेगाव, म्हसवड, लोणंद येथील २२ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.
(चौकट)
जिल्ह्यातील रुग्णालय...
मानसी मेमोरियल हॉस्पिटल (सातारा)
गीतांजली हॉस्पिटल (सातारा)
यशवंत हॉस्पिटल (सातारा)
संजीवन आयसीयू (सातारा)
श्री मंगलमूर्ती क्लिनिक अॅण्ड रिसर्च सेंटर (सातारा)
घोटवडेकर हॉस्पिटल, संचित आयसीयू, निरामय डायलिसीस सेंटर (वाई)
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च (मायणी)
के. एन. गुजर ममोरियल हॉस्पिटल (कऱ्हाड)
सह्याद्री कऱ्हाड हॉस्पिटल (वारुंजी फाटा, कऱ्हाड)
कोळेकर हॉस्पिटल (कऱ्हाड)
श्रद्धा क्लिनिक अॅण्ड एरम मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल (कऱ्हाड)
पाटील हॉस्पिटल (कोरेगाव)
श्रीरंग नर्सिंग होम अॅण्ड सुनंदा डायलिसीस सेंटर ( कोरेगाव)
बी. जे. काटकर हॉस्पिटल (वडूज-दहिवडी मार्ग)
धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (म्हसवड)
दोलताडे हॉस्पिटल (म्हसवड)
ऑन्को लाइफ सेंटर (शेंद्रे, सातारा)
सावित्री हॉस्पिटल (लोणंद)
चिरजीवन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर (फलटण)
निकोप हॉस्पिटल (फलटण)
फलटण लाइफाइन हॉस्पिटल (फलटण)
कृष्णा हाॅस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटर (मलकापूर)