मसूर : मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली जात आहे. आतापर्यंत येथे २ हजार ३५० नागरिकांना लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी दिली.
डॉ. लोखंडे म्हणाले, केंद्रांतर्गत १ एप्रिलपासून ५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांवर कराड येथील कृष्णा हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत तर काहीजण होम आयसोलेशन व संस्थात्मक विलगीकरणात उपचार घेत आहेत. सध्या आरोग्य केंद्रातील तीन ते चार खोल्यांमध्ये कामकाज सुरळीत सुरू आहे. टोकन सिस्टीमद्वारे सामाजिक अंतर ठेवून रांगेत बसवून लोकांना लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र डाकवे, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. रीना वायदंडे, डॉ. अमित जाधव, डॉ. प्रज्वल कांबळे, डॉ. किशोर पाटील तर लस टोचक म्हणून ज्योती जाधव, तबस्सुम मुल्ला, मंगला मुळीक, सविता रुपनर आदी काम पाहत आहेत. पर्यवेक्षक विनया जाधव, सुरेखा सुतार, आरोग्य सेवक अरुण साळुंखे, डी. जे. पाटील, विवेक देशपांडे, आरोग्य सेविका एम. ए. मुळीक, जी. एच. जाधव, देशपांडे, चव्हाण, पटेल, मदतनीस महेश कुंभार आदी कर्मचारी कार्यरत आहेत.
फोटो कॅप्शन : मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित अंतर ठेवून लसीकरण करण्यात येत आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)