मसूर : हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली जात आहे. आत्तापर्यंत येथे सुमारे १ हजार ७०० व खराडे उपकेंद्रात ३७५च्या आसपास नागरिकांना लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख यांनी दिली.
डॉ. देशमुख म्हणाले, केंद्रांतर्गत ९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये गायकवाडवाडी, पाडळी, हेळगावसह कालगावमधील रुग्णाचा समावेश आहे. रुग्णांवर कराड येथील कृष्णा हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर एकजण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहे. केंद्रांतर्गत कायमस्वरूपी फिरती रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. येथे आरटीपीसीआर तपासण्याही मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. लसीचा तुटवडा जाणवतो आहे. पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होण्याची गरज आहे.
डॉ. सतीश देशमुख यांच्याबरोबर डॉ. नितीन साळुंखे, आरोग्य सहायक टी. डी. सानप, आरोग्य सहायिका विजया पवार, आरोग्यसेवक कल्पक ठमके, अविनाश कदम, रामेश्वर बोंद्रे, कांचनकुमार पगार, आरोग्यसेविका एस. एन. शिंदे, सी. जी. मोटकट्टे, सविता बामणे, एस. पी. वड्डे आदी कार्यरत आहेत.