धामणेर : ‘स्वत:च्या आरोग्याबरोबरच समाजाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे,’ असे मत डॉ. चंद्रकांत सातपुते यांनी व्यक्त केले.
नांदगाव, ता. सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. सातपुते म्हणाले, ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरण करणे गरजेचे आहे. कोपर्डे, वेणेगाव, अंगापूर आरोग्य उपकेंद्रांत लसीकरण होत आहे. लोकांनी फक्त आधार कार्ड घेऊन यावे आणि लसीकरण करावे. तापासारखी लक्षणे जाणवल्यास त्वरित संपर्क साधावा.
याठिकाणी नांदगाव, लिंबाचीवाडी, तारगाव, देशमुखनगर, कोपर्डे, जावळवाडी, वेणेगाव येथील लोक लसीकरणासाठी येतात. दिवसात सरासरी २०० लोक लस घेतात, असे सांगण्यात आले.
दरम्यान, लसीकरण मोहिमेत डॉ. मिलिंद रायबोले, आरोग्य सहायिका रेखा ठोंबरे, सविता लिमकर, शेखर देशमुख, सुभाष थोरात, रावस, देवकर, आर्वीकर, पाटील आदी परिश्रम घेत आहेत.
फोटो आहे...
...................................................................