या लसीकरणाच्या प्रारंभप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रमोद ताटे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, इंदोलीचे सरपंच बाबूराव माने, उपसरपंच निखिल संकपाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता माने, डॉ. स्वप्निल उदूगडे उपस्थित होते. या वेळी ८० नागरिकांना लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ व कोमॉर्बिड ग्रामस्थांनी प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आरोग्य केंद्रात येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता माने यांनी केले आहे.
फोटो : ११केआरडी०१
कॅप्शन : इंदोली, ता. कऱ्हाड येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सभापती प्रमोद ताटे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, देवराज पाटील, डॉ. संगीता देशमुख, डॉ. सुजाता माने उपस्थित होत्या.