सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्रे व सतरा गावांचा समावेश आहे. आतापर्यंत परिसरातील विविध गावांचे लोकप्रतिनिधी, विविध शिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाचे काम करणारे शिक्षक, शिक्षिका यांनी लस घेतली आहे. या आरोग्य केंद्रात ८ मार्चपासून लसीकरणास सुरुवात झाली. १४ एप्रिलअखेर ३ हजार १५५ जणांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये ४६ आरोग्य कर्मचारी, १९३ इतर कर्मचारी, ४५ ते ६० वर्षे वयोगटातील व त्यापुढील अशा २ हजार ९१६ जणांना लस देण्यात आली.
लसीकरणादरम्यान कोणालाही कसलाही त्रास झालेला नाही. खबरदारी म्हणून ऑक्सिजन व अन्य जीवरक्षक औषधे व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी लस घेऊन आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पवार यांनी केले आहे.