नागठाणे : कृषी दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत, अपशिंगे (मिल्ट्री) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम पार झाले.
या कार्यक्रमात तालुका पातळी रब्बी ज्वारी पीक स्पर्धाअंतर्गत सातारा तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकविलेल्या शंकर हरिबा निकम यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे व माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय निकम यांच्या उपस्थितीत तसेच मंडल कृषी अधिकारी युवराज काटे यांच्याहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात मंडल कृषी अधिकारी युवराज काटे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच कृषी पर्यवेक्षक अनिल यादव यांनी पीक स्पर्धेमध्ये अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत हरिदास शिवाजी पवार यांच्या शेतावर नारळाची फळबाग लागवड करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सारिका गायकवाड, सदस्या राजश्री करंडे, राधिका जाधव व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे कृषी सहायक अमित घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. विजया जाधव यांनी व्यक्त आभार केले.