निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र रामचंद्र रसाळ यांनी काम पाहिले. यावेळी माजी सभापती रघुनाथ यशवंत नलवडे यांची उपस्थिती होती. सुहास दिनकर कदम, योगेश मोहन गुरव, जालिंदर दादू जामदार, सविता नवनाथ गोडसे, कविता हणमंत निंबाळकर, राजेश्री हणमंत महाडिक, शारदा आनंदा येडगे, सुरेखा जालिंदर पाचुकते या नवनर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. खरेदी-विक्री संघाचे संचालक रघुनाथ नलवडे, ग्रामसेवक एन. एस. कोळी, भानुदास वाघमारे, महिपती कोकरे, सुहास गायकवाड, महादेव गायकवाड, दत्ता माने, शंकर कदम, बाबूराव चव्हाण, लेखनिक रवींद्र चिंचकर, कर्मचारी हणमंत तुकाराम कुंभार, अमोल चव्हाण व सोसायटीचे संचालक उपस्थित होते.
दरम्यान, आबईचीवाडी (ता. कऱ्हाड) येथे सरपंचपदी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील अंकिता रमेश सुर्वे व उपसरपंचपदी अशोक बबन माने यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय दीक्षित यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार माजी सरपंच तानाजी सुर्वे, तुकाराम कोकरे, मच्छिंद्रनाथ जाधव, तात्याबा सुर्वे, अंकुश काटकर, भागवत सुर्वे, महादेव काटकर, विशाल वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आला. आबईचीवाडी ग्रामपंचायत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे नेतृत्व मानणारी आहे. येथे शिवसेनेचे सात व विरोधी गटातील दोन सदस्य निवडून आले आहेत.
फोटो : २५केआरडी०३
कॅप्शन : वसंतगड (ता. कऱ्हाड) येथे उपसरपंचपदी निवड झालेल्या अमित नलवडे यांचा सत्कार रघुनाथ नलवडे, राजेंद्र रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.