शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

वासुदेव आले दहीवडीत दारोदारी स्वच्छतेला : महास्वच्छता अभियान १५ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:53 AM

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायत उतरणार असून, यासाठी दहिवडी परिसरात स्वच्छतेचा संदेश देणारे वासुदेव भल्या पहाटे दहिवडी शहराततून हिंडत आहेत. त्याच बरोबर

ठळक मुद्देपथनाट्यातून जनजागृती

दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायत उतरणार असून, यासाठी दहिवडी परिसरात स्वच्छतेचा संदेश देणारे वासुदेव भल्या पहाटे दहिवडी शहराततून हिंडत आहेत. त्याच बरोबर पथनाट्याचे पथक दहिवडीतील चौकाचौकात स्वच्छतेवर आधारित आपली कला सादर करत आहेत. जनतेचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मायणी एसटी स्टँड चौक, मार्डी चौक, बाजारपटांगण दहिवडी, कॉलेज परशुरामशेठ कन्या विद्यालय जिल्हा परिषद शाळा नगरपंचायत या वर्दळीच्या ठिकाणी कला पथकाने जनजागृती केली आहे. नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. 

महास्वच्छता अभियान १५ तारखेला होणार असून, हजारो हात पुढे येऊन सर्व परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार दहिवडीकर करीत आहेत.माण तालुक्याला लोकसहभागातून काम करण्याची आता सवयच जडली आहे. वॉटरकपनंतरस्वच्छतेमध्ये असणारा पाच हजार मार्कांचा पेपर सोडवून जवळपास ४०० नगरपंचायतींमधून नंबर मिळवायचा, यासाठी दहिवडीकर सरसावले आहेत. यासाठी सोशल मीडियाचा वापर करून स्वच्छतेचा अ‍ॅप डाऊनलोड करून या स्पर्धेची माहिती घरोघरी देण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या १५ तारखेला पूर्ण क्षमतेने शहरातील सर्व मंडळी राजकीय गटातटाला फाटा देत दहिवडी शहरासाठी एकत्र येत असून, हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.

१५ तारखेला होणाºया महास्वच्छता अभियानात शाळा महाविद्यालये कॉलेज, डॉक्टर्स मेडिकल अ‍ॅकॅडमी, बँका, पतसंस्था, गणेश मंडळे, व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी, आर्ट आॅफ लिव्हिंग टीम, अंगणवाडी सेविका आशा यांच्यासाह विविध क्षेत्रात काम करणाºया सामाजिक संस्था यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. अनेक संस्थांनी श्रमदान करून लाखो रुपयांची मदत केली होती. त्यामुळे दहिवडीमधील ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी सरसावले आहेत.ग्रामस्थांचा बक्षीस जिंकण्याचा निर्धारदहिवडी शहराने या स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेतल्यानंतर १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या महिन्यात एक कमिटी येऊन पाहणी करणार आहे. या कालावधीत दहिवडीच्या रोजच्या स्वच्छतेची तसेच ५००० मार्कांची पाहणी करणार आहे. बक्षीस जिंकण्याचा निर्धार दहिवडीकरांतून व्यक्त होत आहे. शहरात स्वच्छतेच्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर