शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब... दरवाढीने ग्राहकांची बोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 5:11 PM

गत सप्ताहात पावसाने झोडपून काढल्याने कोथिंबीर, पालक आणि मेथी शेतात पाणी भरल्याने कुजल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसत आहे. या दिवसांत मुबलक असणाºया या पालेभाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब झाल्या तर दरवाढीने ग्राहकांची मात्र बोंब झाली.

ठळक मुद्देकोथिंबीरसह मेथी, पालकचे दर पन्नाशीकडेलसणी मेथी, पालक पनीर... सध्या नाहीच!पाण्यात बुडून या भाज्या शेतातच कुजल्यापालेभाज्यांनी गाठली पन्नाशी

सातारा, दि. ३  : गत सप्ताहात पावसाने झोडपून काढल्याने कोथिंबीर, पालक आणि मेथी शेतात पाणी भरल्याने कुजल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसत आहे. या दिवसांत मुबलक असणाºया या पालेभाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब झाल्या तर दरवाढीने ग्राहकांची मात्र बोंब झाली.

दसरा, दिवाळीत साताºयाच्या बाजारपेठेत कोथिंबीर, मेथी आणि पालक या पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. अंतरपीक म्हणून या तिन्ही भाज्या घेण्याकडे शेतकºयांचा कल असतो. शहर व परिसरातील शेतकरी या पालेभाज्या घेऊन शहरात विक्रीस आणतात. पण पितृपक्ष पंधरवड्यानंतर सलग लागून राहिलेल्या पावसात या भाज्या चांगल्या उगवून आल्या. त्यानंतर नवरात्रीत तिसºया माळेपर्यंत धो-धो कोसळणाºया पावसाने या पिकांचे नुकसान केले.

जमिनीला लागून काही इंचावर असणाºया या भाज्या पावसाचा मार सोसू शकल्या नाहीत. त्यामुळे मातीत पडून आणि पाण्यात बुडून या भाज्या शेतातच कुजल्या. परिणामी दसºयाच्या दरम्यान या भाज्या बाजारपेठेतून गायबच झाल्या होत्या. 

रविवारी जिल्ह्याच्या दुसºया टोकापासून प्रवास करून आलेल्या कोथिंबीर, मेथी आणि पालकने मात्र भलताच भाव खालला. दसºया दिवशी आणि रविवारी झक्कास जेवणाचा बेत करण्यासाठी कोथिंबीर आणायला गेलेल्यांना दर ऐकून अंगावर शहारे आले.

सुकलेल्या आणि निस्तेज अशा चार काड्यांचा दर दहा आणि पंधरा रुपये चालला होता. त्यातल्या त्यात बरी पालेभाजी ३० आणि ३५ रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होती. चांगल्या दर्जाची पालेभाजी मात्र पन्नासच्या खाली कोणीही द्यायला तयार नव्हते.

लसणी मेथी, पालक पनीर... सध्या नाहीच!साताºयात मेथीची भाजी विविध पद्धतीने खाणारे खवय्ये आहेत. शहर व परिसरातील हॉटेलमध्ये लसणी मेथी, मेथीचं पिठलं, पालक पनीर यांसारखे पदार्थ खाण्यास पसंती दिली जाते. बाजारपेठेतील या दरवाढीमुळे काही हॉटेल व्यावसायिकांनी हे पदार्थ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मसाला पापड, व्हेज मंजुरियन सारख्या पदार्थांवर कोथिंबीरची जागा बारीक चिरलेल्या कोबीने घेतल्याचे पाहायला मिळते.

मंडईतील पालेभाज्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. त्यामुळे जेवणात सुकी भाजी म्हणून आता कडधान्यांच्या उसळी आणि सॅलेडवर सध्या भर दिला आहे. त्याबरोबरचं लोणचं आणि चटणीचा आधार आहे. - चंद्रकांत कुलकर्णी, सातारा.