शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

वाहनांमध्ये कोंबून चालतेय विद्यार्थी वाहतूक : पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:17 AM

प्रगती जाधव-पाटील। सातारा : विद्यार्थी वाहतूक करताना एका वाहनात किती विद्यार्थी असावेत, याचे नियम घालून दिले आहेत. मूठभर सोडले ...

ठळक मुद्देशाळा अन् उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दुर्लक्ष; उपाययोजनेची गरजवाहतूक पोलिसांच्या दृष्टिआड !

प्रगती जाधव-पाटील।सातारा : विद्यार्थी वाहतूक करताना एका वाहनात किती विद्यार्थी असावेत, याचे नियम घालून दिले आहेत. मूठभर सोडले तर सर्रास विद्यार्थ्यांची वाहतूक करताना त्यांना गाडीत कोंबून बसवलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे चित्र धोकादायक आहे. याकडे पालक, शाळा प्रशासन आवश्यक तेवढ्या गांभीर्याने बघत नाही, हे विशेष.

घर आणि शाळांतील अंतर, विस्तारलेल्या भागांमुळे शहराच्या हद्दीवर असलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांना नियमित वेळेत ने-आण करण्यात पालकांना आलेलं अपयश यातून विद्यार्थी वाहतूक अस्तित्वात आली. एकाच गाडीत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवले तर त्यामुळे परस्परांबरोबर वाद, संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती असते. आपले पाल्य कमी गर्दी असलेल्या वाहनातून जाईल, अशी खबरदारी पालकांनी घेतली तर भविष्यातील मोठे धोके टाळणं सहज शक्य होईल.

 

  • सुरक्षिततेचे उपाय!

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला दोन दरवाजे असले पाहिजेत, अशी सक्ती करण्यात आली आहे. रिक्षात बसल्यानंतर विद्यार्थी परस्परांशी दंगा करताना काही अपघात होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. काही रिक्षांनी असे दार बसवलेही आहेत. पण काही रिक्षातून संकटकालीन बाहेर कसं पडावं? हा प्रश्न आहे. दरम्यान, अनेक व्हॅन काचा लावून बंद केल्या जातात. त्यामुळे कोंदट वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांचा श्वासही गुदमरतो. हा त्रास विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत होतो.

  • ज्येष्ठांकडे जबाबदारी नकोच

विद्यार्थी वाहतूक करणारी एक रिक्षा काही महिन्यांपूर्वी पलटी झाली. यात विद्यार्थ्यांसह वयस्क चालकही जखमी झाले. चालकाला समोरून आलेले वाहन चुकविता न आल्याने हा अपघात झाला. याविषयी कुठंही तक्रार दाखल झाली नाही. मात्र, काही दिवस विद्यार्थ्यांची शाळा बुडली. वयोमानानुसार येणारे आजारपण आणि शारीरिक हालचालींवर येणाºया मर्यादा लक्षात घेऊन ज्येष्ठांनी ही जबाबदारी टाळणे आवश्यक आहे.

 

  • वाहतूक पोलिसांच्या दृष्टिआड !

शहराच्या विस्तारलेल्या भागात शाळांची स्थापना करण्यात आली आहे. बोटावर मोजण्याइतक्याच शाळा शहराच्या हद्दीत आहेत.

  • फायर फायटर अभावानेच !

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना फायरफायटर यंत्रणा वाहनात ठेवणं बंधनकारक आहे. मूठभर व्यावसायिक वगळले तर याकडे कोणीच फार गांभीर्याने बघत नाही. रिक्षांच्या तुलनेत व्हॅन आणि बसमध्ये ही यंत्रणा उपलब्ध असल्याचे दिसते.

 

  • वेळे आधीच मुलं घराबाहेर!

शहराच्या वेगवेगळ्या टोकापासून विद्यार्थी गोळा करत वाहनधारक येतात. त्यामुळे शाळेच्या तब्बल एक ते दीड तास आधी विद्यार्थ्यांना घराबाहेर पडावे लागते. एकेक विद्यार्थी गोळा करून मग सगळे एकत्र शाळेत जातात. विशेष म्हणजे सकाळी पावणे आठ वाजता शाळेत येण्यासाठी रोज वीस किलोमीटरचा प्रवास करणारे विद्यार्थी सातारा तालुका हद्दीत आहेत.

 

  • विद्यार्थी बसविण्याची परवानगी अन् वस्तुस्थिती

 

  • वाहन परवानगी वाहतूक
  • रिक्षा बंदी ८
  • व्हॅन १० १८ ते २०
  • बस २० ते ३५ २५ ते ३७

 

आमची नोंदणीकृत संस्था असून त्यात ८० सभासद आहेत. आम्ही नियमानुसारच विद्यार्थी वाहतूक करत आहोत. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी गाडीत भरून धोकादायक वाहतूक करणारे खासगी लोक आहेत. गाडी रंगवून ते हा व्यवसाय करतात. त्यांची नंबरप्लेट मात्र पांढरीच असते. कायदा हातात घेणं आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं हे आम्ही कधीच करणार नाही.- दिलीप शिंदे, अध्यक्ष,सातारा विद्यार्थी सेवा सातारा

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीसStudentविद्यार्थीSchoolशाळा