कऱ्हाड : गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमाल खरेदी-विक्री नियमन मुक्त झाल्यापासून खरेदीदारांवर सरकारने नाशवंत मालावर सहा टक्के अडतीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाने विके्रत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे कारण पुढे करीत कऱ्हाड शहरातील फळे, भाजीपाला किरकोळ विक्रेता संघटनेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून खरेदी व विक्री बंद आंदोलन सुरू केल्याने ग्राहकांची कोंडी झाली आहे. कऱ्हाड हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर मानले जाते. विद्यानगरी असणाऱ्या कऱ्हाड शहर व परिसरात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यांची भूक भागविण्याचे काम शेतकऱ्यांबरोबर किरकोळ भाजीपाला विक्रेतेही करीत आलेले आहेत. शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज पहाटे आलेल्या मालाचा लिलाव होतो. हा शेतीमाल, भाजीपाला हे किरकोळ विक्रेते खरेदी करतात. आणि दिवसभर मंडई परिसरात त्याची विक्री करीत असतात.यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांची उपजीविका चालत असते. परंतु सहा महिन्यांपासून शासनाने शेतीमाल खरेदी-विक्री नियमन मुक्ती केली असून, किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी करणाऱ्या मालावर सहा टक्के अडतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांची कोंडी होऊन बसली आहे.कऱ्हाड येथील मार्केटच्या स्पर्धेत सांगली, मिरज, वडगाव, जयसिंगपूर, कुरुंदवाड, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, घटप्रभा, बेळगाव ही मार्केट आहेत. या मार्केटमधून येणाऱ्या मालाच्या स्पर्धेत विक्री करताना कऱ्हाडचा विक्रेता टिकत नसल्याचे मत येथील किरकोळ व्यापारी व्यक्त करीत आहेत. यातून योग्य निर्णय निघावा यासाठी त्यांनी माल खरेदी व विक्री बंदचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी) बाजार समितीकडून दखल नाही...सहा टक्के अडतीचा निर्णय हा किरकोळ व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असून, यावर योग्य तो तोडगा काढावा याबाबत किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेने कृषी उत्पन्न बाजार समिती कऱ्हाडकडे एक निवेदन दिले आहे. यावेळी दीपक जगताप, संजय बुचडे, भगवान पिसाळ, विजय माळी, अरुणा कांबळे, कय्युम बागवान, अमोल धोंडूगडे, नंदकुमार गुरव, अविनाश कवडे, सोमनाथ पवार, संतोष सावंत, आनंदा कदम, शामराव होगाडे आदींसह किरकोळ भाजी विक्रे ते व्यापारी उपस्थित होते. या निवेदनाद्वारे खरेदी बंद करण्याचा निर्णयही त्यांनी कळविला आहे. मात्र, बाजार समितीकडून याची दखल घेतली गेलेली दिसत नाही. भाज्यांचे दर कडाडलेसध्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. भाजीपाल्यांचे प्रमाण कमी असल्याने त्याचा तुटवडा मार्केटमध्ये जाणवत आहे. त्यातच किरकोळ विक्रेत्यांनी मालाची खरेदी आणि विक्री बंद केल्याने सध्या थेट शेतकरीच काही प्रमाणात भाजीपाला विकताना दिसतात. परिणामी भाज्यांचे दर कडाडल्याचे समजते. त्यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विक्रेत्यांचे भाजी खरेदी-विक्री बंद आंदोलन
By admin | Published: March 22, 2017 11:00 PM