कऱ्हाड : दोन दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषेदेत मी कुठे काँगे्रस पक्ष वा नेत्यांविषयी चुकीचे बोललो नव्हतो; मात्र तरीही माझ्यावर जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. खरंतर त्याला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून माझ्याशी आजच संपर्क करून ‘वाद वाढवू नका. मी आल्यावर बसून मिटवू,’ असे सांगितल्याने ‘आता बाबांच्या भेटीनंतर आपण पुन्हा भेटू,’ अशी साद वर्धन अॅग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकारांना घातली.कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिंदुराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, माजी पंचायत समिती सदस्य दीपक लिमकर, भीमराव डांगे, रहिमतपूरचे नगरसेवक निलेश माने, विकास जाधव आदींची उपस्थिती होती.
कदम म्हणाले, ‘काँगे्रसपक्ष सध्या देशात किंवा राज्यात कुठेच सत्तेत नाही. अशावेळी वेगवेगळ्या विधानांनी आमच्यात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे.हे लक्षात घेऊन पृथ्वीबाबांनी याचा आढावा घेतल्याचे फोनवरून सांगितले. तसेच दोन दिवसांत कºहाडात येतोय. त्यावेळी समारोसमोर बसून अंतर्गत वाद मिटवूया, असाशब्द त्यांनी मला दिला आहे. बाबा माझ्या भावनांचा आदर करतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे पृथ्वीराज बाबा हा विषय हाताळत नाहीत, तोपर्यंत या विषयावर काही बोलने उचित वाटत नाही. म्हणून आजच्याया पत्रकार परिषदेत ऐवढेच बोलने पसंत करतो.त्यांनी आरोप ओढावून घेण्याची गरज नव्हतीखरंतर माझ्या पत्रकार परिषदेत मी जी टीका केली ती राष्ट्रवादीवर केली होती. त्याला त्या पक्षाचे नेते उत्तर देतील, असे वाटत होते. पण प्रत्यक्षात आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी उत्तर देण्याची घाई केली. त्यांनी राष्ट्रवादीवरील केलेले आरोप स्वत:वर ओढावून घेण्याची गरज नव्हती, असे कदम म्हणाले.बघू कोण किती दर देतंयतुम्ही स्वत:चा दर, भाव वाढविण्यासाठी २०१९ ची उमेदवारी जाहीर करण्याचा खटाटोप करताय, असा आरोप आनंदराव पाटील यांनी तुमच्यावर केलाय. याकडे लक्ष वेधले असता बघुया कोण किती माझा दर करतंय, ते असे स्मितहास्य करीत उत्तर देणे त्यांनी पसंत केले.कुठं गद्दारी केली ती दाखवा..हिंदुराव चव्हाण यांना तुम्ही राजकीय गुरू मानता; पण त्यांच्यावर काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षांनी ते गद्दार आहेत, असा आरोप केला आहे, असे छेडले असता. त्यांनी कुठे गद्दारी केली? हे स्पष्ट करा, असे कदम म्हणाले. तर उलट निवास थोरात यांना जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी करण्यासाठी चव्हाणांनी आपल्या बाजार समितीच्या सभापतिपदाचा त्याग केला याची जाणीव ठेवावी, असे आवाहन कदम यांनी केले.तुम्ही बाबांचे काय-काय ऐकणार !खरंतर आज तुम्ही काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी तुमच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, पृथ्वीबाबांचा फोन आल्यामुळे तुम्ही आता सबुरीने घेताय. उद्या त्यांनी उत्तरेतून लढू नका, असे सांगितले तर तुम्ही थांबणार का? असा सवाल करताच काही प्रश्नावर नंतर बोललेले तर बरे पडेल. ऐवढेच उत्तर कदम यांनी यावेळी दिले.त्यांनी जबाबदारीनं बोलायला हवं होतंआनंदराव पाटील यांनी माझ्यावर केलेल्या टिकेमुळे मी खूप व्यथीत झालोय. याबद्दल मला खूप काही बोलायचं होतं. पण.. असं म्हणत त्यांनी अल्पविराम घेतला. आणि नानांनी जबाबदारीनं बोलायला हवं होतं, अशी अपेक्षा व्यक्त करीत आता मला पृथ्वीबाबांकडून न्याय मिळेल, अशी आशा कदम यांनी व्यक्त केली.मसूरच्या कार्यक्रमाचे पृथ्वीबाबांनाही निमंत्रणमसूर येथे गुरुवार, दि. १४ रोजी उत्तरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते माझा सत्कार आयोजित केला आहे. आज पृथ्वीबाबांचा फोन झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाचे निमंत्रण बाबांनाही दिले आहे, असे कदम यांनी सांगितले. त्यावर आनंदराव पाटील यांना निमंत्रण दिले आहे का? असे विचारताच ते उत्तरमधील नाहीत. ऐवढेच उत्तर देणे कदमांनी पसंत केले.