सातारा - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड गावानजीकच्या उड्डाणपुलावर डिझेल भरलेला टॅंकर मंगळवारी सकाळी उलटला. टँकरच्या टाकीतून डिझेल रस्त्यावर ओसंडून वाहू लागल्यामुळे स्थानिक गावकर्यांची पळापळ सुरू झाली. दरम्यान पोलिसांनी उड्डाणपुलावरची वाहतूक थांबविली. मंगळवारी सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने हा डिझेल टॅंकर पाचवड उड्डाणपुलाच्या वळणावर पलटी झाला. सुमारे बारा हजार लिटर क्षमता असलेल्या असलेल्या या टँकरमधून डिझेलची गळती सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक भयभीत झाले. या परिसरातील वाहतूक थांबविण्यात आली असून वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. दरम्यान टँकर सुरक्षेच्या इतर उपाययोजना करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. पाचवड उड्डाणपुलाचे भोग निर्मितीपासूनच सुरू आहेत. या उड्डाणपुलावर कधी भगदाड पडते तर कधी त्याचा कोबा निघून पडतो. त्यामुळे काही ना काही तांत्रिक कारण पुढे करून या उड्डाणपुलावरील वाहतूक थांबविण्यात येते.
VIDEO : पाचवड उड्डाण पुलानजीक टँकर उलटला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 10:26 AM