सातारा : जिल्हा कृषी विकास अधिकारी पदाचा कार्यभार विजय माईनकर यांनी शुक्रवारी स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
मागील आठ दिवसांपूर्वी राज्य शासनाने कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये सातारचे जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांची सांगलीला बदली झाली, तर पवार यांच्या जागी जालना येथील कृषी उपसंचालक विजय माईनकर यांची नियुक्ती झाली होती. पवार यांनी आठ दिवसांपूर्वी साताऱ्याचा पदभार सोडला होता, तर शुक्रवारी माईनकर यांनी साताऱ्याचा पदभार घेतला. माईनकर हे माण तालुक्यातील बिदाल येथील आहेत. यापूर्वी २०१२ ते १५ दरम्यान त्यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारीपदाचा कार्यभार पाहिला होता. त्यानंतर २०१५-१८ दरम्यान ते वाई येथे उप विभागीय कृषी अधिकारी होते. २०१८ ला त्यांची जालना येथे बदली झाली होती.
फोटो दि.२०विजय माईनकर ॲग्री फोटो...
.................................................