शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

माढ्यात उत्तम जानकर-मोहिते दिलजमाई?, भाजपसाठी टेन्शन

By नितीन काळेल | Published: April 16, 2024 6:17 PM

कट्टर विरोधक एकत्रचे संकेत : विमानवारी करूनही हेलकावे 

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण सतत हेलकावे खात असून, उत्तम जानकर यांनी विमानवारी करूनही भाजपच्या पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यातच माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक मोहिते - पाटील यांच्याशीही हातमिळवणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आता जानकर काय निर्णय घेणार यावरच माढ्याचा तिढा राहणार आहे.माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मोहिते - पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक. पण, आताच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने माढ्यात राजकारण सतत बदलत चालले आहे. मोहिते - पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात गेलेत. यामुळे भाजपपुढे संकटे वाढत चाललीत. त्यातच पाठीमागील वेळी खासदार रणजितसिंह यांच्यासाठी मैदानात उतरलेले उत्तम जानकर हेही वेगळ्या भूमिकेत आहेत.त्यामुळेच नाराजी दूर करण्यासाठी सोमवारी खासदार रणजितसिंह, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि उत्तम जानकर हे विशेष विमानाने नागपूरला गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर जानकर यांनी अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचेही जाहीर केले. पण, सोमवारी रात्रीच कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊनही निर्णय दिला नाही. 

लोकसभेला मोहिते; विधानसभेला जानकर ?माळशिरस विधानसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत उत्तम जानकर यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. जानकर हे राष्ट्रवादीकडून लढले तर विराेधात भाजपाचे राम सातपुते होते. आता लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी मोहिते यांना साथ द्यायची तर विधानसभेला सहकार्य घ्यायचे, असे ठरू लागल्याची माहिती समोर येत आहे.

त्यातच जानकर यांनीही मतदारसंघात भाजपाविरोधात नैराश्याचे वातावरण आहे. आम्हाला मोहिते लांबचे नाहीत. मोहिते यांच्याबरोबर युती करा, याच तालुक्यात आमदार, खासदार असावा, ही भावना लोकांमध्ये बळावली, असे वक्तव्य केले आहे. यावरून जानकर यांची मोहितेंशी जवळीक वाढल्याचेच दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीत पाठिंबा कोणाला द्यायचा, याचा निर्णय कार्यकर्ते घेतील. यासाठी १९ एप्रिल रोजी बैठक होणार आहे. तसेच मोहिते - पाटील यांच्याकडूनही ऑफर आली आहे. साटेलोटे करण्याचा निर्णय होऊ शकतो. तरीही कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा करून काय तो निर्णय घेणार आहे. - उत्तम जानकर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराmadha-pcमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलBJPभाजपा