सातारा : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये लोकसहभागातून ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या महाश्रमदानास जिल्ह्यातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोरोनाचे सर्व नियम पाळून गावोगावी लोकसहभागातून श्रमदान करण्यात आले. गाव स्तरावरील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सार्वजनिक ठिकाणे व परिसर, मंदिरे व बाजारपेठेच्या ठिकाणी श्रमदान करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कचरा संकलन व वर्गीकरण, पाण्याचे स्रोत, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी ४० हजार शोषखड्डे निर्मितीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते म्हणाले, ‘देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये महाश्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले होते. स्वच्छता अभियानात सातारा जिल्ह्याचा नावलौकिक आहे. जिल्ह्याने यापूर्वीही देशपातळीवर स्वच्छता ही सेवा व स्वच्छता सर्वेक्षणामध्ये प्रथम मानांकन मिळविले आहे. सातारा जिल्हा राज्यामध्ये कायमच दिशा व मार्गदर्शक ठरला आहे.
कोट :
सातारा जिल्ह्यातील लोकांचा यापूर्वीही स्वच्छतेमध्ये खूप मोठा सहभाग होता. आता सर्व गावांनी १०० दिवसांच्या स्थायित्व व सुजलाम अभियानात सहभागी व्हावे. या माध्यमातून घनकचरा व सांडपाणी प्रकल्पांतर्गत शोषखड्डे काढून सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. - विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी
फोटो दि.२१सातारा झेडपी स्वच्छता फोटो नावाने...
फोटो ओळ : सातारा शहराजवळील संभाजीनगर येथे महास्वच्छता दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख आदी सहभागी झाले होते.
\\\\\\\\\\\\\\\\