शशिकांत क्षीरसागर -रहिमतपूर -समोर साप दिसला की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. त्यामुळे लोक भीतीपोटी सापापासून दूरच राहतात. मात्र, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर सातारा-वडूज-औंध रस्त्यावर चक्क ‘साप’ नावाचे गाव वसले आहे. या नावामागची कहाणीही तेवढीच रंजक आहे. एका गुराख्याने वारुळ खोदल्यावर त्यातून महादेवाची पिंड निघाली व गाव वसविण्याचा दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे.प्राचीन काळात चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होते. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होते. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. गाई चरत असताना एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. एक दिवस त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळाले. वारुळात गुराख्याला जी पिंड सापडली त्याठिकाणी तेव्हा मंदिरही बांधलेले आहे. तर पूर्वीच्या राजापूर म्हणजे चंद्रगिरीलगत जुन्या गावचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात.वाड्याच्या मागे सरदारांनी मारुती मंदिर बांधले आहे. आजही लोक मनोभावे पूजा करतात. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्याकाळी सरदारांनी बांधलेली तालीम आहे. गावाने ती पंरपरा आजही टिकवून ठेवली आहे. गावचे सुपुत्र दिलीप पवार हे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आहेत. शाहू महाराजांनी राजवाड्यास भेट दिली होती. त्यांच्या भेटीनंतर राजवाड्याचे कामकाज त्यांच्या अधिपत्याखाली होऊ लागले. राजवाडा आजही भक्कम स्थितीत आहे.- इंद्रोजीराव कदम, वारसआमच्या गावात सरदारांच्या काळापासून कुस्त्यांची परंपरा आहे. ती परंपरा गावाने आजही जपली आहे. नामांकित मल्ल गावात तयार झाले असून ही परंपरा आम्ही अशी कायम ठेवणार आहे.- प्रा. सतीश कदम, पैलवानवाड्यात चित्रपट, मालिकांची चित्रीकरणराजवाड्याच्या चारही बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. सहा टेहळणी बुरुज आहेत. दरबार हॉल आहे. संकटकाळी बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग आहेत. स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, तांब्याची भांडी, हत्तीच्या आंघोळीचा हौदही पाहायला मिळतो. अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण येथे झालेले आहे.पाच एकरातील राजवाडापेशवेकाळातील सरदार इंद्रोजीराव कदम हे या गावचे सुपुत्र. ते १७ व्या शतकात याठिकाणी पुन्हा वास्तव्यास आले. त्यांनी पाच एकरात ऐतिहासिक राजवाडा बांधला. त्याची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे आहे.
वारुळावर वसले गाव, ‘साप’ त्याचे नाव!
By admin | Published: March 19, 2015 11:36 PM