रशिद शेख
औंध : खटाव तालुक्यातील अनेक गावांत भूमिअभिलेखकडून ड्रोनद्वारे गावोगावी सर्वेक्षण सुरू असून, ग्रामीण भागातील लोकांना याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे, यामध्ये गावठाणमधील मिळकतीचे काम होणार असून, आपापल्या हद्दी निश्चित होणार आहेत. गावोगावचे गावठाण भागातील राहत्या घराचे, आसपासच्या खुल्या जागा, अंतर्गत रस्ते या सर्वांचे सीमांकन करण्याचे काम औंध परिसरातील अनेक गावांत सुरू आहे, यामध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणचे भूमी अभिलेख कार्यालयातील अनेक अधिकारी कर्मचारी औंध परिसरातील गावात काम करीत आहेत.
गोपूज, खरशिंगेसह सर्व गावांतून सध्या कामास सुरुवात झाली असून, प्रत्येक गावाला तारीख कळविण्यात आलेली आहे.
गोपूज येथे वाई येथील कार्यालयात कार्यरत असणारे जी. आर. त्रिगुणे, एस. डी. भूतकर, कुरेशी असे अधिकारी गावातील युवकांच्या टीम पाडून काम करीत आहेत. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित आहेत. या उपक्रमाला युवक वर्गाची मोठी साथ मिळत आहे. कारण ड्रोन फिरविण्याआधी मिळकत, मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, छोटे रस्ते यावर फकी टाकून चिन्हांकित केली जात आहेत. व नंतर ड्रोनने सर्व्हे होणार आहे. यामुळे नोंदी नसणाऱ्या खुल्या जागा, रस्ते यांची नोंद होणार आहे. यामुळे मिळकतीचा वाद विवाद, तंटे मिटण्यास मदत होणार आहे.
(चौकट)
मिळकतदाराला दाराला मिळणार चोख मिळकत कार्ड.
या सर्व्हेनंतर मिळकतदाराला सनद, धारक क्षेत्र, सत्ता प्रकार,प्लॉट निश्चिती याचे पूर्ण रेकॉर्ड तयार होऊन एकच मिळकत कार्ड मिळणार आहे. त्यामुळे इतर बाबीसाठी या गोष्टी फायदेशीर आहेत.
२३औंध
फोटो:-गोपूज येथे ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षण कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंच ॲड. संतोष कमाने, ग्रामसेवक सुनील राजगुरू, कृष्णात जाधव, मारुती खराडे, मोहन खराडे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.