खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक गावात भेट देऊन त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच कविता धायगुडे, उपसरपंच विकास धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत धायगुडे, लिलाबाई अहिरेकर, वनिता धायगुडे, शैला भिसे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बागडे, केंद्रप्रमुख दशरथ धायगुडे, बाळासाहेब साळुंखे, धनाजी अहिरेकर, सरपंच प्रदीप होळकर, नवनाथ ससाणे उपस्थित होते.
तालुक्यातील बाधित गावात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावात सर्वत्र दक्षता घावी. प्रतिबंधित क्षेत्रात दररोज जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. तेथील लोकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. या भागातील क्वारंटाईन केलेल्या लोकांनी नियम मोडू नये यासाठी काळजी घ्यावी. लोकांच्या आरोग्यासाठी कठोर पाऊले उचलावी लागतील. त्यासाठी प्रशासनाने दक्षतेने काम करावे असेही त्यांनी सूचित केले.