मंद्रूळकोळे खुर्द, ता. पाटण येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अभिजित पाटील, सरपंच सतीश कापसे, सरदार पाटील, माजी सरपंच तुकाराम पाटील, बी.एम. पाटील, अविनाश साळुंखे, तंटामुक्ती अध्यक्ष हणमंतराव पाटील, सर्जेराव पाटील, सचिन वाघमारे, बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, पोलीस पाटील विजय लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदूराव पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आजपर्यंत अनेक वेळा विविध पदे मिळून राजकीय बहुमान मिळाला आहे. त्यांनी जी नियोजन सदस्य म्हणून मला संधी दिली आहे, त्याचा उपयोग विभागाच्या विकासासाठी करणार आहोत. विभागात निवडणुका आल्या की दारू, मटण घालून मतदारांना भुलवायचा धंदा सुरू असतो. अशा पद्धतीला आपणास विरोध करायचा आहे. दुसऱ्याच्या खिशातील पैसे घेऊन लाचार होऊ नका.
यावेळी अभिजित पाटील, संजय लोहार प्रा. पंढरीनाथ कापसे यांचेही भाषण झाले. माजी सरपंच वासंती पाटील, ग्रामपंचायत सदस्या कमल यादव, संगीता लोहार, कमल पाटील, बाळकृष्ण कुंभार, अरविंद कुंभार, रूपेश भोई, गणपती कळुगडे, सुरेश रोडे, रामभाऊ रोडे उपस्थित होते. रोहित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब साळुंखे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
फोटो : २६केआरडी०१
कॅप्शन : मंद्रूळकोळे, ता. पाटण येथे ग्रामस्थांच्या वतीने हिंदूराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.