आॅनलाईन लोकमतवाई , दि. १९ : प्रांत कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील पोलिस पाटील पदांचे आरक्षण अडचणीत सापडले आहे. आरक्षणामुळे तालुक्यातील पोलिस पाटील पदांची भरती पंधरा वर्षांपासून रखडली आहे. तालुक्यात ११७ गावे असून केवळ २० पोलिस पाटलांवरच या सर्व गावांचा कारभार सुरू असून गामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.वाई तालुक्यात एकूण ११७ गावे असताना पुणे आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे लोकसंख्येच्या आधारावर जातींचे आरक्षण ठरविण्यासाठी १२८ गावे असल्याची चुकीची माहिती पुरविण्यात आली आहे. आयुक्त कार्यालयाने १२८ गावांच्या आरक्षणाची यादी तयार केल्याने पोलिस पाटील पदांची भरती प्रक्रीया अडचणीत सापडली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ११७ गावांचा कारभार ४० पोलिस पाटील हाकत होते. त्यानंतर २० पोलिस पाटील सेवानिवृत झाले. उरलेल्या २० पोलिस पाटलांवर ११७ गावांचा कारभार सोपविण्यात आल्याने गावगाडा चालवताना पोलिस पाटलांची दमछाक होत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पोलिस पाटील पदांचे आरक्षण आणि भरती प्रक्रिया अडचणीत सापडली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाची गांभियार्ने दखल घेऊन पोलिस पाटील पदांची तातडीने भरती करावी, अशी मागणी गावोगावच्या ग्रामस्थांमधून होत आहे.
गावे ११७ अन् पोलिस पाटील २०
By admin | Published: June 19, 2017 4:07 PM