सातारा: शहरालगत असणाऱ्या वाढे येथे कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय बबन नलवडे आणि हणमंत भुजंगराव जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, वाढे येथील सातारा कंदी पेढे नावाचे दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी दत्तात्रय बबन नलवडे (वय ३२, रा. वाढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, हणमंत भुजंगराव जाधव (वय ४५, रा. वाढे, ता. सातारा) याने त्याच्या मालकीची प्रभात बेकरी चालू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतच्या दोन्ही तक्रारी पोलीस कॉन्स्टेबल सूर्यकांत बबन कुडवे (४७) यांनी दिल्या आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार तोरडमल करत आहेत.