सातारा : कोरोना विषाणूमुळे निर्बंध लागू असतानाही शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत फिरून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग करणाऱ्या सात जणांवर पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोना पार्श्वभूमीवर असणाऱ्या निर्बंधाचे उल्लंघन करत काहीजण दुचाकीवरून फिरत होते. येथील राजवाडा परिसरात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणारे तिघेजण आढळले. त्यांच्याविरोधात हवालदार पंकज मोहिते यांनी तक्रार दिली. त्यानुसार केतन गोविंद महाजन (रा. भवानी पेठ, सातारा), मयुरेश किशोर सहस्त्रबुध्दे (रा. मंगळवार पेठ, सातारा) आणि अन्य एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाणेसमोर आणखी चौघेजण विनाकारण फिरताना दिसून आले. त्यांच्याविरोधात हवालदार मोहन पवार यांनी तक्रार दिली. या तक्रारीनुसार विठ्ठल गणपत निकम (रा. शाहूपुरी), सागर जयसिंग पवार (रा. मतकर कॉलनी, सातारा) आणि असद वाईद सय्यद, सुहेल शौकत मोमीन (दोघेही रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्यावर जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
.............................................