पेट्री :
शिवक्रांती हिंदवी सेना अंतर्गत शिवक्रांती दुर्गवारीमध्ये सह्याद्रीच्या कुशीतील गड, किल्ले संवर्धन, ऐतिहासिक ठेवा संवर्धन मोहीम केली जात आहे. त्याचप्रमाणे विरगळी संवर्धन चळवळ अंतर्गत आपला जो ऐतिहासिक ठेवा, इतिहास आहे. तो जपण्याचा त्याचे संवर्धन करण्याचे काम शिवक्रांती हिंदवी सेना करत आहे. गेल्या महिन्यात आसनी, ता. जावळी येथे काही विरगळी सापडल्या. त्या शोधून त्याचे संवर्धन करून त्याचा अर्थ जनसामान्य लोकांना समजावा म्हणून तेथे माहिती फलक लावण्यात आले. तसेच सध्या गाळदेव, मोळेश्वर, ता. जावळी येथील जे पांडवकालीन हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या मंदिराच्या आवारात विरगळी आढळल्या होत्या. त्यांना सुस्थितीत ठेवून त्यांना मूर्त स्वरूप देण्यात आले. लोकांना ती वास्तू नक्की काय आहे, हे समजण्यासाठी विरगळीची माहिती सांगणारा फलक त्या ठिकाणी लावण्यात आला. या मोहिमेमध्ये शिवक्रांती हिंदवी सेना जावळी तालुकाध्यक्ष शिवा गोरे, नवनाथ कोकरे, अंकुश कोकरे, संस्थापक स्वप्नील धनावडे, बाबूराव जंगम उपस्थित होते.
(कोट )
आपला ऐतिहासिक ठेवा आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला दाखवण्यासाठी त्याचे आपण सर्वांनी संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. तरी आमची सर्वांना विनंती आहे की, आपणही या संवर्धन मोहिमेमध्ये सहभागी व्हावे आणि आपला इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवण्यासाठी त्याचे संवर्धन करावे.
-शिवा गोरे, अध्यक्ष, शिवक्रांती हिंदवी सेना, जावळी तालुका
फोटो आहे..
११पेट्री