सातारा : ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरणासाठी व उभारणीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या अभ्यासाकरिता नेपाळ व बांग्लादेशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी वैकूंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, पुणे यांच्यामार्फ त बुधवार, दि. २३ रोजी भेट दिली. बँकेचे संचालक प्रकाश बडेकर व कांचनताई साळुंखे यांनी स्वागत केले़
सहकारी बँकिंग क्षेत्रात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशात नामांकित आहे. या बँकेचे संचालक मंडळाने जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी व कृषी सहकार कार्यान्वित केले आहे. तसेच ग्रामीण भागात विविध कारणांसाठी करत असलेले अर्थसहाय्य याचा अभ्यास व सातारा जिल्हा बँकेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी ही भेट आयोजित केलेली होती़
अभ्यास भेटीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत करताना बँकेचे सरव्यवस्थापक, प्रशासन व वित्त एस. एन. जाधव म्हणाले, ‘बँकेची स्थापना दिगवंत यशवंतराव चव्हाण यांनी केलेली आहे़ यशवंतराव चव्हाण यांचा कृषी विकासाचा संकल्प व कृषी औद्योगिकरणाचा ध्यास बँकेने आपल्या प्रत्येक योजनेत कार्यान्वित केला आहे़. शेतकºयाला केंद्र्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेने अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत़ बँक आज तळमळीने व निष्ठेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली आहे.
विविध प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत आहे. बँकेच्या ठेवी, कर्ज, वसुली, भाग-भांडवल, लाभांश, एनपीए, स्वयंसहायता बचत गट, प्रशिक्षण केंद्र्र, शेतकरी ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी, किसान क्रेडिट कार्ड, विविध कर्ज योजना, बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल नाबार्डचे मिळालेले बेस्ट परफॉर्मन्स अॅवॉर्डस, आयएसओ प्राप्त मानांकन व लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये टॉपर को-आॅपरेटिव्ह बँक म्हणून नोंद झाली आहे. महाराष्ट्र बँक्स असोसिएशनचे उत्कृष्ट कामकाज अॅवॉर्डस आदींची माहिती दिली. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या निकषांप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे बँक कामकाज करीत आहे.सेवेतील सातत्य व कामकाजातील गुणवत्ता यामुळे देशातील व परदेशातील विविध मान्यवर, बँकिंग व सहकारी क्षेत्रातील संस्थांना रिझर्व्ह बँक, नाबार्ड व देशपातळीवरील महत्त्वपूर्ण आर्थिक संस्था यांच्यामार्फत अभ्यासासाठी निमंत्रित केले जाते़कृषी, सहकाराचा गौरवबँकेसह त्या देशातील व त्या प्रांतातील सहकारी बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करता येतो. तसेच या बँकेची यशस्वीता प्रत्यक्ष भेटीमुळे परदेशी पाहुण्यांना अनुभवता येते़ हा अनुभव व विचारांची देवाण-घेवाण झाल्यामुळे पुढील कामकाजासाठी दिशा प्राप्त होते़ आज ही प्रगल्भता या बँकेस प्राप्त झाल्यामुळे कृषी व सहकाराचा गौरव होत असल्याचे दिसून येते़सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेस नेपाळ, बांग्लादेशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील पदाधिकाºयांनी भेटी दिली.