कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या आबासाहेब मोहिते कृषी प्रदर्शनास लाखो शेतकऱ्यांनी भेट दिली. प्रदर्शन कालावधीत शेती व्यवसायाशी निगडीत अनेक स्पर्धा झाल्या़ या सर्वच स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत संकरित कालवड स्पर्धेमध्ये बाजीराव लायकर यांच्या मालकीच्या कालवडला प्रथम, रमेश जाधव द्वितीय, प्रदीप जाधव तृतीय, योगेश पाटील चतुर्थ तर जैनुद्दीन शिकलगार व आनंदा खुडे यांच्या मालकीच्या संकरित कालवडला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. खिलार कालवड स्पर्धेमध्ये खेडमधील महेंद्र पाटील यांच्या मालकीच्या कालवडला प्रथम, लाडेवाडी येथील पार्थ सूर्यवंशी द्वितीय, नवलेवाडीतील परीख शेख तृतीय तर हणमंतराव दळवी, विनायक पाटील, रामचंद्र शिंंदे यांच्या मालकीच्या कालवडला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. म्हशींच्या स्पर्धेत खरातवाडी येथील नामदेव खरात, येलूरमधील दत्तात्रय शिनगारे, संजय शिनगारे, पोतले येथील समृद्धी कुलकर्णी, बबन कदम, नेर्लेतील दत्तात्रय माळी यांच्या मालकीच्या म्हशींना अनुक्रमे पारितोषिक देण्यात आले.देशी गाई स्पर्धेत कटगुणमधील धीरज गायकवाड, रेठरे बुद्रुकमधील विश्वासराव मोहिते, दत्तात्रय जाधव, लहू डोईफोडे, शेरे येथील सतीश निकम, पाचवड येथील वसंतराव घाडगे यांच्या गार्इंना अनुक्रमे क्रमांक देण्यात आले. तर संकरित गाई स्पर्धेत नरसिंहपूर येथील संजय कुंभार, येलूरमधील सखाराङ्कशिनगारे, संभाजी शिनगारे, कालेटेक येथील सचिन हरदास, सम्राट बच्चे, येलूरमधील सुवर्णा शिनगारे यांच्या मालकीच्या गार्इंना प्रथम पाच पारितोषिके देण्यात आली. प्रदर्शनात बैलांच्याही स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये खरातवाडी येथील शामराव मदने, साखराळेतील सुहास पिसतुरे, शेरेतील संकेत पवार, धनगावमधील शशिकांत पवार, नांदगावमधील शिवाजी पाटील, आष्टा येथील आनंदराव ढोले, खरातवाडीतील भीमराव मदने, बहेतील सुरेश थोरात, कडेपुरातील अभिजित यादव, कालेतील विनायक गेरे, येडेमच्छिंद्रमधील यशवंत मोरे, बहेतील श्रीराम बडवे, महेश पाटील, साखराळेतील संकेत डांगे, शेरेतील गणेश पवार, विट्यातील अभिजित पाटील यांच्या मालकीच्या बैलांना पारितोषिके देण्यात आली. (प्रतिनिधी)फूल स्पर्धेत जतच्या शेतकऱ्यांचा सहभागफूल स्पर्धेत येणकेतील संगीता गरुड, लवणमाचीतील संतोष सोनूलकर, कारी येथील संजय मोरे, येणकेतील विनायक गरूड, वाठारमधील सुनील जाधव, वसंतराव जाधव तर फळ स्पर्धेत येणकेतील प्रशांत गरूड, निवास गरूड, पोतलेतील सुनंदा गरूड, विजयादेवी सुतार, जत येथील बाबासाहेब मारगुडे, वाठारमधील शंकर जाधव यांनी पारितोषिके पटकावली. लॅब्राडॉर, पश्मी, पामेलियन श्वानांनी वेधले लक्षश्वान स्पर्धेमध्ये इस्लामपूरमधील प्रफुल्ल पाटील, संजय सपकाळ, पलूसमधील संकेत येसुगडे, वाठारमधील श्रीधर खैर, कवलापूरमधील महादेव हाके, नारायणवाडीतील योगेंद्र यादव, कोल्हापूरमधील अजयसिंंह चौगुले, कार्वेतील रणजित थोरात, इस्लामपूरमधील विलास नाईक, अमोल यादव, कोल्हापूरमधील सम्राट कालेकर, बेरडमाचीतील दीपक मंडले, अपशिंगे येथील प्रमोद निकम, पुणेतील गौरव घाडगे, ओगलेवाडीतील जगन्नाथ कांबळे, कार्वे नाका येथील राजू मुळीक, वर्णे येथील अमोल पाटील, नेर्ले येथील दत्तात्रय रोकडे, वारुंजीतील जावेद सुतार यांच्या श्वानांनी पारितोषिके मिळविली.
‘कृष्णे’च्या कृषी प्रदर्शनास लाखो शेतकऱ्यांची भेट
By admin | Published: November 02, 2014 9:06 PM