जोतिबा : पुजारी समाजाच्या मागण्या निश्चित मार्गी लावू असे आश्वासन खा. उदयनराजे भोसले यांनी तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगरला सदिच्छा भेटी वेळी दिले. खा. उदयनराजे म्हणाले, ज्या घरांन्याचा आम्ही वारसा सांगतो. त्याचा वसा पुढे घेऊन जात असताना ज्या काळात शिवाजी महाराजानी कोणावर अन्याय होऊ दिला नाही. त्याच प्रमाणे आपण ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही. पुजारी समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यात मी कमी पडणार नाही. माज्या हातुन आपली जास्ती जास्त सेवा घडावी अशी ईच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
जोतिबा डोंगरावर सांयकाळी ६ वाजता खा. उदयनराजे यांचे आगमन झाले. प्रथम शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालुन जोतिबा मंदिरात प्रवेश केला. जोतिबा मंदिरात पुजारी समाज व देवस्थान समितीच्या वतिने स्वागत करण्यात आले. सनई चौगडा वाजवून राजेशाही पध्दतीने स्वागत करण्यात आले. खा. उदयनराजे यांनी दख्खनचा राजा श्री. जोतिबा दर्शन घेतले. सेंट्रल प्लाझा या ठिकाणी जोतिबा देवाची भाविक भक्तांना समग्र माहीती देणारी वेबसाईट व अॅप्लिकेशन, जोतिबा देवाची राजमुद्रा अनावरण खा. उदयनराजे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी संजय आमाणे, राहुल मिटके, माजी सरपंच शिवाजी सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे, के.डी.सी. संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, लखन लादे, रघुनाथ ठाकरे आदि सह ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.