वाई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, मास्कचा वापर करावा, गर्दीत जाण्याचे टाळावे, यासाठी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी व गावागावात श्रीनाथ प्रतिष्ठान, (सातारा) निर्मित जनजागृती कलापथक बावधन (ता. वाई)चे कलाकार लोकगीत व पथनाट्य यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोविड-१९ लसीकरण जनजागृती अभियानांतर्गत चित्ररथ सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाला आहे. या चित्ररथातून दोन कलाकारांच्यावतीने आत्मनिर्भर भारत व कोविड-१९ लसीकरण जनजागृती महा अभियान राबविण्यात येत आहे. हा उपक्रम श्रीनाथ प्रतिष्ठान सातारानिर्मित जनजागृती कलापथकाच्या पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त केले जात आहे.
शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी व त्यासंबंधी उपाययोजनांची माहिती या चित्ररथावरील कलाकार अर्जुन लगस व संतोष कांबळे हे दोघेही लोकांना गीतातून व पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत सांगत होते. मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, सॅनिटायझरचा वापर करा, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा, गर्दी ठिकाणी जाणे टाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका.
घरी राहा सुरक्षित राहा आदी गोष्टी या कलाकाराने आपल्या पहाडी आवाजात गीतगायनातून समजून सांगितले.
१५ वाई..
वाईत कोरोनाबाबत जनजागृती करताना लोककलाकार अर्जुन लगस व संतोष कांबळे.