भुर्इंज : धोम धरणात जमीन गेली. दुसऱ्यांचे संसार फुलवण्यासाठी स्वत:चा संसार पाठीवर ठेवून देशोधडीला लागलो. या त्यागाची किमत प्रशासनाला मात्र राहिली नाही. त्यामुळेच गेली अनेक महिने हेलपाटे मारून जीव मेटाकुटीला आला आहे. मधुमेहासारख्या आजारामुळे पायाचा अंगठा कापला, दोनदा शस्त्रक्रिया झाल्या. जो-जो कागद मागितला तो दिला, तरीही उद्या या, परवा या, अशा आश्वासनांवर आता आयुष्य संपायची वेळ आली असून, कायदेशीर मागणीबाबत न्याय मिळणार का? असा सवाल वाई तालुक्यातील एकसर येथील प्रकल्पग्रस्त मानसिंग लक्ष्मण उभे यांनी केला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात उभे यांनी म्हटले आहे, की धोम धरणात जमीन संपादीत झाली. त्या बदल्यात भुर्इंज येथे १९७५ मध्ये ४० गुंठे जमीन मिळाली. या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील नवीन व अविभाज्य शर्त कमी करावी, यासाठी वाईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ३ मे २०१४ पासून लेखी पाठपुरावा करत आहे. या कालावधीत त्यांनी ज्या-ज्या अटींची, कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले, त्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली आहे. असे असूनही आता केवळ हेलपाट्यावरच माझा जीव मेटाकुटीस आणला गेला आहे.मधुमेहाच्या आजारामुळे दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, पायाचा अंगठा कापला आहे. या आजारपणामुळे प्रकृती साथ देईना झाली आहे. त्यातच या सरकारी अनास्थेमुळे शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून न्याय्य व कायदेशीर मागणी सर्व पूर्तता करूनही मान्य होत नसल्याने मानसिक स्वास्थ बिघडले आहे. (प्रतिनिधी) केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. दोन्हीकडचे सरकार बदलले आहे. मात्र, या बदलाचे पडसात प्रशासनात दिसून येत नाहीत. एकाच प्रश्नासाठी वारंवार खेलपाटे मारावे लागतात. जनतेची अस्मिता जपण्याचा प्रयत्न शासनस्तरावर होणे अपेक्षित आहे.- पांडुरंग भोसले, ज्येष्ठ नागरिकआजारी असताना आंदोलन करणारमुळातच सुरुवातीपासूनच या प्रकरणात प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. त्यामध्ये जमीन मिळालेल्या आदेशाची प्रत, कब्जेपट्टीची प्रत, निवाडा प्रत यासह प्रत्येक कागद मिळविण्यासाठी प्रचंड हेलपाटे मारावे लागले आहेत. हे सर्व कमी की काय म्हणून गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून नवीन व अविभाज्य शर्त कमी करण्यास हेलपाटे मारत आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास या दुर्धर आजारासोबत आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही उभे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रकृती खालावली तरी प्रतीक्षा न्याय-हक्काची
By admin | Published: July 23, 2016 10:13 PM